कृषी विभागाने सोयाबीन बियाणे उत्पादन कंपनीला लावला लगाम, वाहतुकीसाठी घातल्या नवीन अटी…काय आहे या अटी…
Department of Agriculture imposes restraint on soybean seed production company, imposes new conditions for transportation… What are the conditions Read detailed news
सोयाबीनचे बियाणे यंदा महाग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, यामध्ये सोयाबीन बियाणे उत्पादक कंपन्यांनी वाहतूक करताना सात बॅग पेक्षा मोठी थप्पी लावू नये, अशी अट महत्वपूर्ण घालण्यात आली आहे. सात बॅगपेक्षा मोठी थप्पी लावल्यास, कारवाई करण्याचा इशारा कृषी विभागाने दिला आहे.
गेल्या वर्षी सोयाबीनचे निकृष्ट बियाण्यांमुळे सोयाबीनचे पिके उगवले नाही कृषी विभागाकडे 62 हजारांवरून जास्त तक्रारी आल्या होत्या, काही शेतकर्यांनी याकरिता निदर्शने देखील केली होती, यामुळे राज्य सरकारने 54 ठिकाणी सदोष बियाण्याबाबत फौजदारी गुन्हे दाखल केले.
याकरिता कृषी विभागाने सोयाबीनचे बियाणे बाबत नवीन अटी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, सोयाबीन वाहतूक करताना मोठी थप्पी आढळून आल्यास विक्रेते व संबंधित कंपनी याला जबाबदार असेल अशी माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली.
70 टक्केपेक्षा कमी उगवून क्षमता असलेल्या बियाण्यांची कोणालाही विक्री करू नये तसेच बियाणे वाणनिहाय कंपनी निहाय याची नोंदणी करून ठेवणे आवश्यक आहे.
कृषी विभागाच्या या निर्णयामुळे यंदाच्या वर्षी सोयाबीन बियाण्यामध्ये फसवणूक होणार नाही. तसेच बियाणे उत्पादन कंपन्यानीला व तसेच विक्रेत्यांना एक प्रकारे जरब बसेल व निकृष्ट बियाण्यांची विक्री थांबेल..