औरंगाबाद : कापूस (Cotton) हे औरंगाबाद जिल्ह्यातील प्रमूख पिक असुन ठिबक – सुक्ष्म सिंचन सुविधेच्या सहाय्याने बागायती क्षेञातील बहुतांश शेतकरी पुर्व हंगामी कापुस (Pre-seasonal cotton) या पिकाची २५ मे ते ७ जून दरम्यान लागवड करतात.
शेंदरी बोंडअळीचा प्रार्दूभाव (Infestation of Shendari Bondali) टाळण्यासाठी १५ जून नंतर आणि जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्यानंतरच कापूस पिकाची लागवड करणे होईल, असा असा सल्ला कृषी विभागाने (Advice from the Department of Agriculture) दिला आहे.
जाणून घ्या ; आपल्या मोबाईलवर, ‘पिक विमा’ संदर्भात तक्रार कशी नोंदवाल?
जूनपासून कापूस पिकाच्या बियाण्याची विक्री सुरु झाली आहे. मागील दोन ते तीन दिवसांमध्ये जिल्ह्यातील काही भागांमध्य पूर्व मोसमी पाऊस झालेला असून शेतकऱ्यांची लागवडीसाठी लगबग सुरू झालेले आहे . परंतु हा पाऊस लागवडीसाठ पुरेसे नसून गडबडीत लागवड करून पुढे एखादा मोठा खंड पडला तरी अडचणी निर्माण होऊ शकतात.
शेती व तंत्रज्ञान: शेतीसाठी आले आहे, “फोर इन वन यंत्र” पहा काय आहेत याची वैशिष्ट्ये..!
गुलाबी बोंडअळीच्या पिढीचा अन्नपुरवठा खंडित (Food supply disrupted) होण्यासाठी पूर्वहंगामी कापसाची लागवड सर्व शेतकऱ्यांनी टाळणे आवश्यक असल्याचे हंगामी कापसाला फुलोरा येण्याची वेळ व गुलाबी बोंड आळी (Pink bond larvae) च्या सुप्त अवस्थेतून निघालेले पतंग यांची अंडी घालण्याची अवस्था यांचा कालावधी जुळल्याने गुलाबी बोंडअळीची पहिली पिढी त्या क्षेत्रात वाढते व पुढे वाढलेली पिढी इतर शेतकऱ्यांच्या शेतावर प्रादुर्भाव करते.
शेतकऱ्यांनी १० ते १५ जून नंतर व १०० मिलिमीटर पाऊस होऊन जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्यानंतरच कापूस पिकाची लागवड करणे योग्य होईल, असे त्यांनी नमूद केले.
हेही वाचा :
1)जाणून घ्या खरीप हंगामातील ‘सूर्यफूल’ लागवडीची संपूर्ण माहिती…
2) सामान्य नागरिकांच्या खिशाला लागणार कात्री; ATM मधून पैसे काढणे होणार महाग…