ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Sugarcane |शेतकऱ्याच्या हितासाठी मांडल्या मागण्या.. दिला राज्यातील ऊस वाहतूक बंद पाडण्याचा इशारा..!

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागण्या –

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ( Swabhimani shetkari sanghatna ) प्रमुख राजू शेट्टी यांनी विविध प्रकारच्या मागण्या मांडल्या आहेत. उसाला एफआरपी ( FRP) मागील वर्षापेक्षा दोनशे रुपये जास्त मिळावे अशी मागणी त्यांनी केली आहे त्यासोबतच यावर्षी कारखान्यांनी एकरकमी एफआरपी द्यावी, हंगाम संपल्यानंतर 350 रपये दिले जावेत असे सुद्धा(Agriculure information) सांगितले.

वाचा: पीक विमा कंपीकडून आता पीक विमा ! तक्रारीसाठी करा या नवीन क्रमांकावर संपर्क…

ऊस वाहतूक बंद करण्याचा इशारा –

जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा देखील शेट्टींनी दिलाय. अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील राहुरी (Rahuri) तालुक्यातील टाकळीमियाँ इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परीषद संपन्न (Agriculure information)झाली. यावेळी शेट्टी बोलत होते. दरम्यान, सरकारनं जर गांभिर्यानं लक्ष दिलं नाही तर 17 आणि 18 नोव्हेंबरला राज्यातील ऊस वाहतूक बंद पाडणार असल्याचा इशाराही शेट्टींनी यावेळी दिला.

ब्रेकिंग न्युज: आता केंद्रसरकरकडून साखर निर्यातीवर एक वर्षासाठी बंदी; होणार शेतकऱ्यांवर परिणाम..

पुण्यात साखर आयुक्तालयावर भव्य मोर्चा –

राजू शेट्टी ने येत्या 7 नोव्हेंबरला पुण्यात साखर आयुक्तालयावर भव्य मोर्चा काढणार असल्याचा इशारा देखील शेट्टींनी यावेळी दिला आहे. सरकारनं गांभिर्याने लक्ष दिले नाही तर 17 आणि 18 नोव्हेंबरला राज्यातील ऊस वाहतूक बंद पाडणार असल्याचा इशारा त्यांनी (Agriculure information)दिला.ऊस दराच्या मागणीसह साखर कारखाने काट्यामध्ये शेतकऱ्यांचा ऊस लुटतात असा आरोप देखील राजू शेट्टी यांनी कारखानदारांवर केलाय. राज्यातील साखर कारखान्याचे काटे ऑनलाईन केले जावेत. तसेच सर्व साखर कारखान्याच्या काट्यांवर साखर आयुक्तांचे नियंत्रण असावे आणि यासंदर्भात अंमलबजावणी करावी या मागणीसाठी पुण्यात साखर आयुक्तालयावर भव्य मोर्चा काढला जाणार आहे.

मुकादम व्यवस्था संपवावी –

मुकादमांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लुट होत असल्यानं मुकादम व्यवस्था संपवावी. बांधकाम मजुरांप्रमाणं महामंडळानं ऊस तोडणी मजूर पुरवावेत. मुकादम कारखाना आणि शेतकऱ्यांची देखील फसवणूक करतात असे राजू शेट्टी यावेळी म्हणाले. त्यामुळं मुकादम व्यवस्था संपवावी अशी मागणी यावेळी राजू शेट्टींनी (Agriculure information)केली. साखरेच्या एफआरपीबाबत केंद्राकडून कोटा पद्धत लागू होवो अथवा काही होवो, मात्र शेतकऱ्यांचे पैसे द्या. केंद्राबरोबर काय भांडायच ते भांडा, आम्ही देखील सोबत येऊ असा टोला राजू शेट्टी यांनी विरोधकांना लागवला आहे.

वाचा: सामान्यांना खुशखबर ! दिवाळीनंतर लगेच सर्वात प्रथम तब्बल ‘एवढ्या’ जास्त रुपयांनी एलपीजी गॅस स्वस्त ..!

शेतकऱ्यांवर कोणाचे लक्ष नाही –

राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक दोघांचंही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष नाही. सत्ताधारी भांडणातच मशगुल आहेत. त्यामुळं आता शेचकऱ्यांनीचं ठरवाव, चोरांच्या मागे जावं की नाही अशी टीका राजू शेट्टींनी केली. गेल्या 25 वर्षात पहिल्यांदाच शेतकऱ्यांबद्दल सरकारची एव्हढी असंवेदनशीलता आणि बेजबाबदारपणा (Agriculure information)पाहतोय. सवंग लोकप्रियतेसाठी नुसत्या घोषणा सुरु आहेत. सरकारला लाज वाटली पाहीजे अशी घणाघाती टीका राजू शेट्टी यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली. आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यातील वादावर बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, यांना काय सत्तेचा सारीपाट मांडायचा ते मांडू द्या. मात्र शेतकऱ्यांना आज संघर्षाची गरज आहे. त्या लढाईत मी उतरलो असल्याचे शेट्टी यावेळी म्हणाले.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button