योजना

Kharip Crops | ‘या’ जिल्ह्यांमध्ये पीककर्ज वाटपास उशीर, बँकांकडून ‘अशी’ केली जातीये शेतकऱ्यांची अडवणूक…

जून महिना आला की शेतकऱ्यांची सुगीची लगबग सुरू होते. यंदाच्या वर्षीही अनेक ठिकाणी चांगला पाऊस (Rain) झाल्याने शेतकऱ्यांनी पेरण्यांना (Sowing) सुरुवात केली आहे.

Kharip Crops | या काळात बियाणे, खते, मशागत (Cultivated) या कामांसाठी भरपूर खर्च येतो. म्हणून खरीप हंगामाच्या (Kharip Hangam 2022) पार्श्वभूमीवर सरकारकडून पीककर्ज (crop loan) वाटपास सुरवात झाली आहे. परंतु मराठवाड्यातील पीककर्ज वाटप संथ गतीने सुरु असल्याचे चित्र आहे.

Loan Distribution | जिल्ह्यांतील कर्जवाटप
मराठवाड्यात 13 जूनपर्यंत फक्त 22. 38 टक्के पीककर्जाचे वाटप झाले आहे. मराठवाड्यासाठी 10 हजार 804 कोटींचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात 387.19 कोटी रुपये (28.58), लातूर जिल्ह्यात 254.87 कोटी रुपये ( 15.28 टक्के), उस्मानाबाद 363.96 कोटी (26.60 टक्के), बीड 359.03 कोटी (20.40 टक्के), नांदेड 435.25 कोटी ( 28.66 टक्के), जालना 259.70 कोटी (21.29 टक्के), परभणी 214.78 कोटी (19.43 टक्के), हिंगोली 143.71 (22.38 टक्के) एवढे कर्जवाटप ( Kharip crop loan 2022 ) करण्यात आले आहे.

वाचाCrop Insurance | महाराष्ट्रात पंतप्रधान पीक विमा योजनेत बदल, नव्या पॅटर्नचा शेतकऱ्यांना होणार फायदा?

Economical Problem | मालमत्ता गहाण ठेवण्याची वेळ
सध्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. अशावेळी पीक कर्ज देखील लवकर उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांना बँकेत इतर मालमत्ता गहाण ठेऊन शेतीच्या भांडवलासाठी पैसे जमा करायला सुरुवात केलीय. मागच्या दोन वर्षात कोरोना व अतिवृष्टी या संकटांमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे . अशातच शेतकऱ्यांनी आता पुन्हा खचू नये यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक आहे.

वाचाCrop Insurance | खरीप पीक विम्यासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर, ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणारं फायदा

प्रशासनाने वेळेत लक्ष देण्याची गरज
शेती हा पूर्णतः निसर्गावर अवलंबून असणारा व्यवसाय आहे. यामध्ये पेरणी, काढणी ,मशागत या गोष्टी वेळेतच कराव्या लागतात. एकदा वेळ निघून गेली की शेतकऱ्यांचे नुकसान हे ठरलेले असते. पीक कर्जाचे काम जरी संथ गतीने सुरू असले तरी शेतीचे काम संथ गतीने होत नाही. यातच शेतकऱ्यांना कर्जाचा पुरवठा करण्यासाठी बँकांना प्रशासनाकडून विशेष सूचना दिल्या गेल्या असल्या तरी अनेक बँका (Banks) कर्जवाटप करताना शेतकऱ्यांची अडवणूक करताना पहायला मिळत आहेत. म्हणून प्रशासनाने याकडे वेळेतच विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button