कृषी बातम्या
ट्रेंडिंग

केंद्र शासनाचा निर्णय: या खतांना अनुदार जाहीर, शेतकर्यांना मिळणार मोठा दिलासा..

शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. आता शेतकऱ्यांना या खतांवर मिळणार अनुदान. १२ ऑक्टोबर २०२१ रोजी पंतप्रधान यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्री मंडळ यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीमध्ये २८ हजार ६०२ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करून खताची दर वाढ पुन्हा एकदा रोकण्यात आलेली आहे. यामुळे खताचे भाववाढ स्थिर राहणार आहेत. याविषयी सविस्तर माहिती पाहुया..

वाचा –

या संदर्भातील प्रसिद्धी पत्रक पाहूया..

वर्ष २०२१-२२ (१ ऑक्टोबर,२०२१ ते ३१ मार्च, २०२२ पर्यंत) साठी फॉस्फेटिक आणि पोटेसिक (P&K) खतांसाठी पोषण घटक आधारित अनुदानित (NBS) दरांना केंद्रीय मंत्री मंडळाची मंजुरी. यासाठी २८,६५५ कोटी रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.

2021-22 च्या रब्बी हंगामासाठी नायट्रोजनसाठी प्रतिकिलो 18.789 रुपये, फॉस्फेटसाठी प्रतिकिलो 45.323 रुपये, पोटॅशियमसाठी प्रतिकिलो 10.116 रुपये, तर सल्फरसाठी प्रतिकिलो 2.374 रुपये अनुदान निश्चित करण्यात आले आहे.

या खतांचा लाभ मिळणार–

रब्बी हंगाम २०२१-२२ च्या दरम्यान शेतकर्यांना खताच्या परवडणार्या किमतीत सर्व पी & के खताची सहज उपलब्धता सुनिश्चित होईल आणि डीएपीसाठी अतिरिक्त अनुदानाचे विशेष पॅकेज देवून आणि तीन सर्वाधिक खप असलेल्या एनपीके ग्रेड साठी सध्याचे अनुदान सुरु ठेवून कृषी क्षेत्राला मदत होईल. डी-अमोनियम फॉस्फेट (डीएपी) वर ४३८ रुपये प्रती बॅग लाभ आणि एनपीके २०-२०-०-१३ आणि एनपीके १२-३२-१६ वर प्रत्येकी १०० रुपये प्रती बॅग फायदा मिळेल, जेणेकरून या खतांच्या किमती शेतकर्यांना परवडतील.

वाचा –

अंमलबजावणी आणि उद्दिष्टे –

पी आणि के खतावर अनुदान आर्थिक संमतीने मंजूर केलेल्या एनबीएस दरानुसार दिले जाईल जेणेकरून शेतकर्यांना परवडणार्या किमतीत हि खते सहज उपलब्ध सरकार खत उत्पादक/आयात दरांमार्फत शेतकर्यांना सवलतीच्या दरात युरिया आणि २४ ग्रेड पी & के खते उपलब्ध करून देत आहे. पी आणि के खतावरील अनुदान एनबीएस योजनेद्वारे ०१.०४.२०१० पासून नियंत्रित केले जाते. शेतकर्यांच्या कल्याणाच्या दृष्टिकोनानुसार शेतकर्यांना परवडणार्या किमतीत पी आणि के खतांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. खत कंपन्यांना उपरोक्त दरानुसार अनुदान दिले जाईल जेणेकरून ते शेतकर्यांना परवडण्यायोग्य किमतीत खाते उपलब्ध करून देवू शकतील.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button