Cyclone Mandous | बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राचे बुधवारी सायंकाळी उशिरा चक्रीवादळात रूपांतर झाले. या चक्रीवादळाला ‘मंडोस’ (Cyclone Mandos) असे नाव देण्यात आले आहे. या चक्रीवादळाचा परिणाम प्रामुख्याने दक्षिणेकडील राज्यांवर (Maharashtra Weather) होण्याची शक्यता आहे. दरम्यान, चक्रीवादळ 8 तारखेला तामिळनाडू किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता असल्याने या भागातील 13 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रात (Maharashtra) देखील दिसून येईल, असा अंदाज आहे.
वाचा:अर्रर्र..! पुढचे चार दिवस राज्यात पावसाचं वातावरण; त्वरित जाणून घ्या हवामान आधारित कृषी सल्ला
चक्रीवादळात झालं रूपांतर
8 आणि 9 तारखेला कोकणात आणि 9 तारखेला मध्य महाराष्ट्रात (Maharashtra Rains) हलक्या पावसाची शक्यता आहे. त्याचप्रमाणे बहुतांश भागात ढगाळ वातावरण राहणार असून तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य भागात दोन दिवसांपासून कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. जसजशी तिची तीव्रता वाढत गेली तसतसे ते चक्रीवादळात रूपांतरित झाले.
बिग ब्रेकिंग! शेतकऱ्यांना तब्बल 50 लाख रुपये देण्याचा राज्य सरकारचा निर्णय; जाणून घ्या सविस्तर
मुसळधार पावसाचा इशारा
बुधवारी रात्री हे चक्रीवादळ चेन्नई शहराच्या दक्षिण-पूर्वेस सुमारे 700 किमी समुद्रात होते. चक्रीवादळाचा संभाव्य मार्ग उत्तर-पश्चिम दिशेने आहे. हे चक्रीवादळ आज सकाळी आंध्र प्रदेश, तामिळनाडूच्या किनारपट्टीजवळ असण्याची शक्यता आहे. या दरम्यान त्याची तीव्रता अधिक असेल. या चक्रीवादळाचा प्रभाव 11 डिसेंबरपर्यंत राहील. 9 डिसेंबर रोजी दक्षिणेला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
वाचा: आनंदाची बातमी! पुढील महिन्यात कापसाचे दर वाढणार; जाणून घ्या चालू महिन्यात कसा राहील बाजारभाव?
महाराष्ट्रावर होणार परिणाम
या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रावर होण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने दक्षिण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. त्याचा परिणाम दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांवर होईल. 9 ते 11 डिसेंबर दरम्यान दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. 10 डिसेंबर रोजी मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा:
- खर्च आणि फसवणूक टाळण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय! आता शेतकऱ्यांना मिळणार घरबसल्या कीटकनाशक
- ब्रेकिंग न्यूज! ऊस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी; एकरकमी एफआरपी देण्यासंदर्भात सरकारचा मोठा निर्णय
Web Title: Dad! Big danger of sky storm over Maharashtra, alert to 13 districts directly with rain