कृषी बातम्या

परवानगी घेऊनच झाडे तोडा: ‘या’ कलम अंतर्गत ७/१२ वर झाडांची करा नोंद अन्यथा नियमांचे उल्लंघन केल्यास होईल कारवाई…

Cut down the trees only with permission: Register the trees on 7/12 under this section, otherwise action will be taken if the rules are violated.

झाडे तोडताना (Tree slaughter) झाडांची मालकी हक्कामध्ये नोंद केलेली असावी व त्यांनतर वनविभागाची परवानगीसाठी अर्ज करावे लागतात. जमीन महसूल अधिनियमच्या कलम २५ च्या अंतर्गत ७/१२ वरती ज्या व्यक्तीची नोंद असलेल्या झाडाची मालकी असते. त्याच्या क्षेत्रातील झाडाच्या कलमाच्या अंतर्गत तो मालक असतो. अधिकृतपणे मालक होण्यासाठी त्या झाडाची नोंद आपल्या ७/१२ वरती करणे गरजेचे असते. आंबा, चिंच, फणस, नारळ किंवा अनेक फळझाडे आहेत या झाडांची पिक पाहणी म्हणून ७/१२ वरती नोंद केलेली असते. तसेच बाभळ , लिंब , खैर , धावडा , अशी वेगवेगळी झाडे आहेत, याचा इंधनासाठी उपयोग केला जातो. अशी झाडे इंधन उपयोगी झाडे म्हणून नोंद केलेली असतात.

हवामान अलर्ट: “या” जिल्ह्यात 5-6 दिवसापासून सतत पावसाचा अंदाज; काही पिकांना फायदा तर काही पिकांचे नुकसान..

झाडे तोडण्याबाबत अधिनियम आहे या अधिनियमच्या अंतर्गत १६ झाडांचा समावेश करण्यात आलेला आहे. व झाडाची तोडणी शासनाच्या परवानगी शिवाय घेतली जावू शकत नाही. यामधून आता चंदनाला वगळण्यात आलेलं आहे. साग, चिंच, आंबा, फणस, खैर, अंजन, जांभूळ, बिजा अशा प्रकारची जी वेगवेगळी झाडे आहेत. ही झाडे वन विभागाची परवानगी घेतल्याशिवाय झाडे तोडता येत नाहीत.

वाचा :  शेतकऱ्याने फक्त एक एसएमएसने ‘या’ तारीख पर्यंत करा आधार-पॅन लिंक; लिंकिंग न केल्यास येईल पैसे काढण्यास अडचण…

वाचा : गव्हाच्या या “तीन” जाती देतील अधिक उत्पन्न; भरघोस उत्पन्न काढायचे आहे का? मग पहाच…

झाडाची मालकी कशी दाखवायची?

कायदेशीर झाडांची मालकी दाखवायची असेल तर इ पिक पाहणीच्या माध्यमातून झाडांची नोंद करणे गरजेचे असते.
इ- पिक पाहणीच्या माध्यमातून किंवा तलाठ्यांच्या माध्यमातून झाडांची नोंद करू शकता. नोंद केल्यावरती झाडे तोडण्यास वनविभागाच्या माध्यमातून परवानगी दिली जाते, महसूल अधिनियमाच्या तरतुदीच्या अंतर्गत, महसूल विभागाच्या माध्यमातून तसेच तलाठी तहसीलदार यांच्या माध्यमातून परवानगी घेवू शकतो.

वाचा : “या” जिल्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाचा पीक विमा देण्यासाठी दिल्या सूचना; इतर ठिकाणीही लवकरच दिला जाणार पीक विमा..

वनविभागाच्या माध्यमातून परवानगी दिली जाते-

झाडे तोडण्याबाबतचा अधिनियम १९६६ आहे या अंतर्गत सोळा झाडांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्या झाडाची तोडणी करण्यासाठी वनविभागाच्या माध्यमातून परवानगी घ्यावी लागते. परवानगी देताना झाड वाळून गेले असेल तर अशा झाडाला तोडण्यासाठी परवानगी दिली जाते. तसेच झाडावर रोग पडून किंवा वार्यामुळे झाड वाकून मोडले असेल किंवा सागवान, चंदन किंवा इतर जी वृक्षलागवड करतो, विक्रीच्या उद्देशाने असतील, परवाना घेतलेला असतो, अशी झाडे वनीकरणाच्या दृष्टीने पक्क्व झाले असतील तर अशी झाडे सुद्धा तोडण्यासाठी परवानगी दिली जाते. तसेच ज्या झाडांमुळे वाहतुकीला अडचण येत असेल अशी झाडे पण तोडू शकतो. झाडे तोडण्यामागे परवानगी घेणे गरजेचे आहे. अर्ज करण्यासाठी वनविभागाच्या पोर्टल वर जाऊन तिथे पब्लिक सर्विस च्या अतर्गत अर्ज भरू शकता.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button