मटका सिंचन पद्धतीने फळ पिकांच्या लागवडी; कोरडवाहू क्षेत्रात ठरतेय अत्यंत फायदेशीर, पहा नियोजन पद्धती सविस्तर..
महाराष्ट्रात फळ भाज्या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात कोरडवाहू क्षेत्रात केली जाते. कोरडवाहू क्षेत्रात ही पिके वाढवणे अत्यंत कठीण होऊन जाते. पाण्याच्या कमतरतेमुळे ठिबक सिंचनाचा वापर केला जातो. अशा वेळी ठिबक सिंचन अत्यंत उपयोगी ठरते. या प्रमाणेच आधुनिक ठिबक सिंचनबद्दल माहीत आहे का? अत्यंत उपयुक्त असणार ‘तंत्र मटका सिंचन’ या आधुनिक सिंचनाबद्दल आपण जाणून घेणार आहेत. जे तुमच्यासाठी अत्यंत उपयोगी ठरेल. पाहूया सविस्तर माहिती..
वाचा –
सूर्यप्रकाशा सोबत झाडांना अत्यंत पाण्याची तितकीच आवश्यकता असते. झाडांची वाढ होण्यासाठी व चांगले उत्पादन काढण्यासाठी पाणी महत्वाचा भाग आहे. पाण्याची कमतरता ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणीही मटका सिंचन वापरुन चांगल्या प्रकारे फळांची फुलांची बाग फुलवू शकता. ती कशी? पाहूया..
मटका सिंचन –
मटका जमिनीमध्ये पुरत असताना शेणखत जरूर टाका. मटक्याच्या तळ्यात दोन छिद्रे पाडा. हे पाणी मुरमाळ माहीत खोलवर जिरपते व चांगला ओलावा टिकून राहतो. तसेच मटक्यातील पाणी कमी जास्त वापरता येते. हा एक फायदा आहे.
वाचा –
मटका सिंचनाचे फायदे पाहूया –
१) कमी खरच तसेच पाण्याची बचत होते.
२) झाडे व्यवस्थित वाढतात.
३) कोरडवाहू जागेत पिके चांगली येतात.
४) उन्हाळ्यात पाण्याचा तान सहन करण्याची ताकद येते.
५) मुळे मजबूत होतात.
६) पर्यावरण पूरक.
उन्हाळ्यात किवा कोरडवाहू क्षेत्रात फळ पिकांना मटका सिंचन उपयुक्त ठरू शकते. पाण्याची टंचाई असणाऱ्या भागात मटका सिंचनाची व्यवस्था चांगली होऊ शकते. घराच्या परिसरात मटका सिंचन करून फळांची फुलांची बाग फुलवता येते. तसेच पिकांचे पण मटका सिंचन मधून चांगले उत्पन्न निघू शकते.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा