कृषी सल्ला
ट्रेंडिंग

चंदनाची शेती करा आणि मिळवा लाखो रुपयांचा फायदा…

चंदनाच्या झाडाचे अनेक उपयुक्त फायदे असल्याने चंदनाच्या झाडाच्या विक्रीतून शेतकऱ्याला चांगला आर्थिक नफा मिळवता येऊ शकतो. शेतकऱ्याने चंदनाची शेती केली तर शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल.

मराठवाड्या सारख्या दुष्काळी भागातही चंदनाची झाडे चांगली आलेली दिसतात. पण शेतकरी त्याची शेती करताना जास्त दिसत नाहीत. शेतकऱ्याने चंदनाच्या शेती बद्दल माहिती घेऊन कमी जागेमध्ये चंदनाची शेती केली तर शेतकऱ्याला कोटी रुपयांचा फायदा होऊ शकतो.

एक चंदनाचे झाड लाखो रुपये मिळवून देते. चंदनाच्या झाडाचा उपयोग होम हवन, पूजेत होतो. देशातल्या खूप कमी भागात चंदनाची शेती केलेली आपल्याला दिसून येते. चंदनाच्या एका झाडा पासून कमीत कमी ५ लाख रुपये मिळतात.

चंदनाची शेती अश्या प्रकारे केली जाते…
चंदनाचे एक रोपटे लावले तर त्याचे झाड होण्यासाठी १२ वर्षे लागतात,आणि त्याच्या पासून ५ ते ६ लाख रुपये निश्चित मिळतात. महाराष्ट्रात विदर्भामध्ये शेतकऱ्यांनी चंदनाच्या शेतीचे प्रयोग केले आहेत.

चंदनाच्या रोपट्याची किंमत किती…
चंदनाच्या झाडाची किंमत जशी जास्त आहे तशीच त्याच्या रोपाची हि किमंत जास्त आहे. चंदनाच्या एका रोपाची किंमत ५०० ते ६०० रुपये इतकी असते. महाराष्ट्रात आता चंदनाच्या झाडाचे बियाणे मिळते. सरकारही चंदनाच्या शेतीला प्रोत्साहन देते.

चंदनाच्या झाडाची लागवड कशी केली जाते…
चंदनाच्या १०० बिया पेरल्या तर त्यातल्या १० ते १५ % किंवा जास्तीत जास्त २०% येतात. १ किलो बियांपासून जास्तीत जास्त २०० ते २५० रोपे तयार होतात. जून महिन्यामध्ये याची लागवड केली जाते. जवळपास २ वर्षे रोपट्याची वाढ पिशवीतच होते. झाडाची उंची १२ ते १५ फूट होण्यासाठी ५ ते ६ वर्षे लागतात. सर्व प्रकारच्या मातीत चंदनाच्या झाडाची वाढ चांगली होते.

सरकारचे धोरण…
चंदनाच्या झाडाची निर्यात शेतकरी करू शकत नाही व कुठल्याही कंपनीला यासाठी निर्यातबंदी आहे. म्हणजेच फक्त सरकारच चंदनाच्या शेतीची निर्यात करू शकते. वन विभागाला तशी माहिती द्यावी लागते. त्यानंतरच निर्यात होऊ शकते. सध्या प्रति किलो २७ हजार रुपये त्याची किंमत आहे. एका झाडापासून १५ ते २० किलो चंदनाचे लाकूड मिळते.

चंदनाच्या झाडापासून सुगंधी द्रव्ये सौदर्य प्रसाधने, आयुर्वेदिक औषधे ,बनवतात. चंदनाच झाड जेवढा जास्त काळ ठेवलं तेवढा जास्त काळ त्याच वजन वाढत. ५ ते ४७ डिग्री तापमानात चंदन व्यवस्थित येतो.

WEB TITLE: Cultivate sandalwood and earn millions of rupees

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button