औषधी वनस्पतींची शेती अशी करा; कमी जागेत मिळेल लाखोंमध्ये उत्पन्न,पहा सविस्तर माहिती..
औषधी वनस्पतींची लागवड हा शेतकऱ्यांना एक उत्तम पर्याय आहे. या शेतीने अनेक शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होईल. नैसर्गिक वनस्पतींचा वापर करुन तयार करण्यात आलेल्या औषधांना मोठी बाजारपेठ उपलब्ध करणयात आलेली आहे. याविषयी सविस्तर माहिती घेऊया…
हे ही वाचा –
अनेक कंपन्या करारावर अशी औषधी वनस्पतीची शेती करण्याची संधी देत आहेत. कमी खर्चात ही शेती सुरु होते असे नाही तर यातून दीर्घकालीन कमाई देखील निश्चित आहे. याकरिता क्षेत्रही कमी लागते आणि गुंतवणूकही कमी होते. औषधी वनस्पतीचे लहान-लहान मळे केले जातात. याकरिता केवळ 15 हजार रुपयांचा खर्च येतो तर उत्पादन हे लाखोंमध्ये होते. चला तर मग पाहू की अशा कोणत्या वनस्पती आहेत ज्यातून लाखोंचे उत्पन्न मिळणार आहे.
जागा कमी उत्पादन अधिक
औषधी वनस्पतीमध्ये तुळशी, तुळशी, आर्टेमिसिया, ज्येष्ठमध, कोरफड इत्यादी बहुतेक हर्बल वनस्पती अगदी कमी वेळात तयार होतात. याकरिता शेतीच असावी असे काही नाही तर लहान कुंडामध्येही या वनस्पती वाढतात. या वनस्पतींची लागवड सुरू करण्यासाठी केवळ काही हजार रुपये खर्च खर्च होणार आहेत. पण उत्पन्न लाखोंच्या घरात आहे. आजकाल देशात अनेक औषध कंपन्या आहेत ज्या पिके खरेदी करेपर्यंत करार करतात. त्यामुळे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याला त्याचा धोका होत नाही. त्याची कमाई ही ठरवलेलीच असते.
तुळस ही धार्मिक बाबींशी जोडलेली असते परंतु औषधी गुणधर्म यामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळेच तुळशीला वेगळे असे महत्व आहे. युजेनॉल आणि मिथायलंड सिनामेटला कारणीभूत असलेल्या तुळशीचे अनेक प्रकार आहेत. कर्करोगासारख्या गंभीर आजारांसाठी औषधे तयार करण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. 1 हेक्टरवर तुळशी पिकवण्यासाठी केवळ 15 हजार रुपये खर्च येतो. योग्य जोपासना आणि करारानुसार विक्री झाली तर या 1 हेक्टरातून 3 लाखापर्यंतचे उत्पादन मिळणार आहे.
प्रशिक्षणामुळे अधिक सुलभ
औषधी वनस्पतीलागवडीसाठी चांगले प्रशिक्षण महत्वाचे आहे. त्यावरच भवितव्य ठरणार आहे. यातून फसवणूक होऊ नये याची काळजी महत्वाची आहे. लखनौस्थित सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल अँड अॅरोमॅटिक प्लांट्स (CMAP) या वनस्पतींच्या लागवडीसाठी प्रशिक्षण देते. सीएमएपीच्या माध्यमातूनच औषध कंपन्याही तुमच्याशी संपर्क साधतात. त्यामुळे मार्केट शोधत फिरण्याची आवश्यकताही नाही.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा