फळ शेती

मोसंबी पिकातील असे करा पीक संरक्षण..

Crop Protection in Citrus Crop ..

मोसंबी या फळ पिकात अलीकडच्या काही वर्षात सातत्याने सिल्ला, मावा , पाने खाणारी अळी ,पिठ्या ढेकूण ,खवले कीड , पायकुज आणि डिंक्या ,शेंडे मर या सारख्या विविध कीड व रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. याशिवाय सगळ्यात महत्वाचे म्हणजे मोसंबी तील फळगळ मोठ्या प्रमाणात होत आहे. फळगळ यावर उपाय योजना याप्रमाणे, आंतरमशागतीची कामे वेळेवर करून तणनियंत्रण करावे. किडींचा प्रादुर्भाव लक्षात घेता सापळे लावावे. अन्नद्रव्यांची आणि नत्राची कमतरता लक्षात घेऊन ती पूर्ण करावी.

एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन...

मावा किडीच्या नियंत्रणासाठी डायमिथोएट 20 मिलीलीटर दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पाने खाणाऱ्या अळीचा नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस 20 मिलीलीटर 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. पिठ्या ढेकूण च्या नियंत्रणासाठी क्लोरोपायरीफॉस 25 मिलीलीटर किंवा डायमेथोएट 20 मिलीलीटर 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

खवले कीड च्या नियंत्रणासाठी क्लोरोपायरीफॉस 25ml + 50 मिलिलिटर दूध अथवा व्हर्टिसिलियम लेकॅनी 40 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेंडे मर रोखण्यासाठी पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर रोगग्रस्त फांद्या छाटून त्या ठिकाणी बोर्डो पेस्ट लावावी. कार्बेन्डाझिम 10 ग्रॅम किंवा मॅन्कोझेब 20 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड 30 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून वर्षातून तीन ते चार वेळा फवारावे.

पश्चिम महाराष्ट्रातील मध्यम काळात जमिनीत लागवड केलेल्या मोसंबी चे आंबिया बहराचे सेंद्रिय पद्धतीने दर्जेदार फळांचे अधिक उत्पादनासाठी 20 किलो गांडूळ खत अधिक 8किलो निंबोळी पेंड प्रति झाड प्रतिवर्षी जमिनीतून द्यावे. तसेच पीकसंरक्षणासाठी पाच टक्के निंबोळी अर्क व एक टक्का निंबोळी तेल यांची फवारणी करण्याची शिफारस आहे.
अशा पद्धतीने मोसंबी फळबागांमध्ये पीक संरक्षण केलं तर आपल्याला 400 ते 500 फळ प्रति झाड प्रति वर्ष मिळून शकेल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button