Crop insurance: शेतकऱ्यांना मिळेल का न्याय? पिकविम्या मध्ये मोठी तफावत वाचा सविस्तर बातमी…
Crop insurance: Will farmers get justice? Read the big difference in crop insurance Detailed News
औरंगाबाद: पिक विमाचा (Crop insurance) मुद्दा पुन्हा एकदा पेटला असल्याने शेतकऱ्यांना पिक विमा बाबत मी आहे मिळेल का हा प्रश्न उपस्थित होत आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार पाच हजार आठशे कोटी रुपये शेतकऱ्यांनी पिक विमा कंपनीने दिली आहे, परंतु अप्रत्यक्षरित्या चार हजार आठशे कोटी रुपये कंपन्याना मिळताय, ही फार गंभीर गोष्ट आहे. असे राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे (Agriculture Minister Dadaji Bhuse) यांनी बैठकीच्या वेळेस सांगितले.
औरंगाबाद कृषी विभागाच्या खरीप हंगामाच्या (Kharif season) बैठकी नंतर पत्रकार परिषदेत श्री. भुसे बोलत होते. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कंपन्यांकडून शेतकऱ्यांची लूट होताना दिसत आहे, पीकविमा कंपन्यांकडून नुकसानीपोटी शेतकऱ्यांकडून दिल्या जाणाऱ्या परताव्यात मोठी तफावत असून अत्यंत गंभीर बाब आहे. त्याकरता सर्व पातळीवर कसुन चौकशी करण्यात येणार आहे राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे (Agriculture Minister Dada Bhuse) यांनी दिली.
जिल्ह्यामध्ये, खताची कमतरता (Fertilizer shortage) तसेच बियाण्याची कमतरता जाणवणार नाही, त्याचप्रमाणे युरिया, डीएपी खत यांचा मोठ्या प्रमाणात उपलब्धता आहे त्यामुळे शेतकरी याबद्दल काळजी करू नये तसेच महात्मा ज्योतीबा फुले कर्जमुक्ती (Mahatma Jyotiba Phule Debt Relief) योजनेतून ३१ लाख शेतकऱ्यांना २० हजार कोटी रुपये वर्ग केले आहे.
दहा टक्के महाबीज (Mahabeej) कडून तसेच उर्वरित खाजगी कंपन्यांकडून बियाणे उपलब्ध होणार आहेत. शासन कायम विविध नैसर्गिक आपत्ती काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत आहे. बियाण्यांच्या बाबतीत किंवा खताच्या बाबतीमध्ये अडचण किंवा समस्या आल्यास कृषी अधिकाऱ्यांकडे (To the agricultural authorities) तक्रार करावी असे आव्हान देखील शेतकऱ्यांना यावेळी केले.
हेही वाचा:
1)दूधव्यवसाय संकटात! शेतकऱ्यांकडून अवघ्या, ‘इतके’ रुपयात दूध खरेदी…