योजना

Crop Insurance | अर्रर्र..! शेवटच्या दिवशी पीक विम्याचा सर्व्हर झाला डाऊन; जाणून घ्या मिळेल का मुदतवाढ?

Arrrr..! Crop Insurance Server Down on Last Day; Know whether you will get an extension?

Crop Insurance | प्रधानमंत्री फसल बीमा योजनेच्या रब्बी हंगामातील ज्वारी पिकाचा विमा भरण्यासाठी अंतिम मुदत 30 नोव्हेंबर होती. मात्र, शेवटच्या दिवशीच पीक विमा भरण्याच्या सर्व्हरमध्ये आधारचा सर्व्हर नाॅट वर्किंग झाल्याने शेतकरी विमा भरण्यासाठी सी.एस.सी केंद्रात रांगा लावून थांबले. शेतकऱ्यांच्या मागणीवरून शासनाने ज्वारीचा पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची शक्यता आहे.

रब्बी हंगामात ज्वारी पिकाचे क्षेत्र सर्वाधिक असते. या पिकावर अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने ज्वारी पिकाचा विमा 1 रुपयात भरण्याची योजना आखली होती. मात्र, सर्व्हर डाऊन झाल्याने शेतकऱ्यांना विमा भरता आला नाही.

यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. त्यांनी ज्वारीचा पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून शासन लवकरच मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

वाचा : Dairy Production | दूध उत्पादक शेतकरी होणार मालामाल! गायी आणि म्हशी देणारं फक्त वासरांना जन्म, ‘अशा’प्रकारे वाढणार दुग्धोत्पादन

याबाबत जिल्हा कृषी अधिकारी विक्रमकुमार पाटील यांनी सांगितले की, सर्व्हर डाऊन झाल्याने शेतकऱ्यांना विमा भरता आला नाही. याबाबत शासनाला कळविण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून लवकरच मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला जाईल.

रब्बी हंगामात गहू, हरभरा या पिकाला 15 डिसेंबर पर्यंत मुदत दिली जाते, मग ज्वारीसाठी 30 नोव्हेंबरचीच मुदत का? रब्बी हंगामातील सर्व पिकांना एकाच दिवशी विमा भरण्याची मुदत अंतिम देणे आवश्यक आहे. अखेरच्या दिवसांत सर्व्हर डाऊन होण्याची ही परंपरा नेहमीची झाली आहे. यावर शासनाने योग्य तो विचार करणे आवश्यक आहे.

Web Title: Arrrr..! Crop Insurance Server Down on Last Day; Know whether you will get an extension?

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button