ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Crop Insurance | अर्रर्र..! कापसाला अग्रिम नुकसान भरपाई देण्यास विमा कंपनीचा नकार; ‘या’ पिकांसाठी दर्शवली तयारी

Arrrr..! Insurance company's refusal to pay advance compensation to Cotton; Preparedness shown for 'Ya' crops

Crop Insurance | छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अत्यल्प पावसामुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील ३२१ गावांतील मका, सोयाबीन आणि कापूस या प्रमुख पिकांची उत्पादनक्षमता ५० टक्क्यांपेक्षा अधिक घटल्याचा अहवाल कृषी विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता. या अहवालानुसार, ९ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी कापूस, सोयाबीन आणि मका पीकविमा रकमेच्या २५ टक्के अग्रिम नुकसानभरपाई देण्याचे आदेश विमा कंपनीला दिले होते.

‘या’ पिकांसाठी दर्शवली तयारी
या आदेशानंतर विमा कंपनीने तूर्त कापसाची अग्रिम नुकसान भरपाई देण्यास नकार देत केवळ मका आणि सोयाबीन पीकविमा रकमेची अग्रिम नुकसानभरपाई देण्याची तयारी दर्शविली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. केंद्र सरकारने जिल्ह्यासाठी चोलामंडलम एम. एस. जनरल विमा कंपनीची नियुक्ती केली होती.

वाचा : 80 % ठिबक अनुदान देण्याचा निर्णय जाहीर, या शेतकऱ्यांच्या हातात पडणार इतके अनुदान..

एक रुपयात विमा
प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना एक रुपयात विमा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीकविम्याचे ११ लाख ५० हजार ८४४ अर्ज सादर केले. यासाठी शेतकऱ्यांनी ११ लाख ५० हजार ८४४ रुपये तर राज्य सरकारने शेतकऱ्यांचा हिस्सा म्हणून ११८ कोटी आणि स्वत:चा हिस्सा २६७ कोटी ८४ लाख, केंद्र सरकारने १४९ कोटी ६५ लाख असे एकूण ५३५ कोटी ४९ लाख रुपये विमा हप्त्यापोटी कंपनीला देण्यात आले होते.

अत्यल्प पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान
अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यातील खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसाअभावी ५० टक्क्यांपेक्षा अधिक घटल्याचा अहवाल तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार आणि विमा कंपनीचे प्रतिनिधी यांच्या संयुक्त समितीने जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता. अहवालानुसार, ५ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी एक अधिसूचना काढून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम विमा रक्कम नुकसानभरपाई म्हणून देण्याचे निर्देश विमा कंपनीला दिले होते.

कापसाला अग्रिम विमा देण्यास नकार
कापसाच्या विम्याची रक्कम जास्त असल्याने कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कंपनीचे पैसे वाचविण्यासाठी कापसाची अग्रिम नुकसान भरपाई देण्यास नकार दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांनी विमा कंपनीचा निर्णय तात्काळ बदलण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांनी म्हटले आहे की, अग्रिम नुकसानभरपाई मिळाल्यास त्यांना आर्थिक अडचणीतून मुक्तता मिळेल. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी लक्ष घालून विमा कंपनीला कापसाची अग्रिम नुकसानभरपाई देण्यास भाग पाडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

अग्रिम नुकसानभरपाई देण्यास विमा कंपनीचा नकार

  • अत्यल्प पावसामुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान
  • 5 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी अग्रिम नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले
  • विमा कंपनीने कापसाची अग्रिम नुकसानभरपाई देण्यास नकार
  • शेतकऱ्यांमध्ये नाराजी
  • शेतकऱ्यांनी विमा कंपनीचा निर्णय बदलण्याची मागणी
  • जिल्हाधिकारी लक्ष घालून विमा कंपनीला भाग पाडण्याची मागणी

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Arrrr..! Insurance company’s refusal to pay advance compensation to Cotton; Preparedness shown for ‘Ya’ crops

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button