फळ शेतीयोजना

Crop Insurance | ‘या’ योजनेअंतर्गत तब्बल 180 कोटींचा पीक विमा वितरित, पात्र शेतकऱ्यांनाच मिळणार लाभ

आंबिया फळपिक विमा योजना 2021-22 साठी 180 कोटी रुपये निधी (Fund) वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. हा शासन निर्णय (Government decision) 13 जून 2022 रोजी घेण्यात आला आहे.

Crop Insurance | हा शासन निर्णय (Government decision) 13 जून 2022 रोजी घेण्यात आला आहे. आंबिया बहार फळ पीक विमा (Ambia Bahar Fruit Crop Insurance) 2021-22 राबवत असताना 8 फळपिकासाठी जी महसूल मंडळ (Board of Revenue) पात्र आहेत. त्यामध्ये योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती. या अंतर्गत प्रायोगिक तत्त्वावर स्ट्रॉबेरी (Strawberry) आणि पपईचा (Papaya) समावेश करण्यात आलेला होता. 2021- 22 पासून याअंतर्गत गारपिटीचा (Hailstorm) नुकसान देखील समाविष्ट करण्यात आलेलं होतं. याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.

आंबिया बहार पीक विमा
आंबिया बहार पीक विमा

180 कोटींचा निधी वितरित
ज्या शेतकऱ्यांनी गारपीटीसाठीही विमा भरला होता. त्या शेतकऱ्यांनाही या अंतर्गत विमा कव्हर करण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर मार्च,एप्रिल आणि मे महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झाली होती. त्याचमुळे फळबागांचे नुकसान झाले होते. जळगावमधील केळी, नागपुरची संत्री, नाशिकची द्राक्ष सोलापूर हिंगोली मध्ये मोठ्या प्रमाणात फळबागांचे नुकसान झाले होते. त्याचमुळे शेतकरी या पीकविम्याच्या प्रतीक्षेत होते. पीक विमा संदर्भात 13 जून रोजी 180 कोटी निधी वितरीत करण्याचा शासन निर्णय घेण्यात आला आहे.

वाचा: Pineapple Farming | काय सांगता? अननसाच्या शेतीतून मिळतंय लाखोंच उत्पन्न, जाणून घ्या व्यवस्थापन पद्धत

वाचा: Kharip Crops | ‘या’ जिल्ह्यांमध्ये पीककर्ज वाटपास उशीर, बँकांकडून ‘अशी’ केली जातीये शेतकऱ्यांची अडवणूक…

सरकारकडून देण्यात आले निर्देश
या शासन निर्णयामध्ये केवळ आंबिया बहार पीक विम्यासाठीच हा 180 कोटीचा निधी वापरण्यात यावा असे निर्देश सरकारकडून देण्यात आले आहेत. त्याचमुळे या फळ पीक विमा साठी शेतकरी पात्र असतील त्या शेतकऱ्यांना या निधीतून लवकरच फळ पिक विमा वाटप केला जाऊ शकतो. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्तीमधून नुकसान झाल्यास त्वरित पीक विम्यासाठी क्लेम करावा. जेणेकरून शेतकऱ्यांना तात्काळ या विम्याचा लाभ होईल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button