कृषी सल्ला

“या” जिल्ह्यांचा पिक विमा दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार…

खरीप पीकविमा २०२१ महत्त्वाची माहीत
नांदेड जिल्हातील सोयाबीन या पिकासाठी सर्व मंडळी पात्र आहेत. खरीप ज्वारी, तूर, कापूस, या पिकांचे नुकसान देखील मोठ्या प्रमाणात झाले आहे. या पिकांसाठी सुद्धा नांदेड जिल्ह्यामध्ये पिक विमा मिळणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वच्या सर्व मंडळ सोयाबीन या पिकासाठी पात्र आहेत. काही लोक बाजरी, तूर, कापूस या पिकासाठी तर काही मंडळ मका उडीद या पिकासाठी पात्र आहेत. बाकी जिल्ह्यांची देखील माहिती आपण सविस्तर पाहुया..

वाचा –

अकोला, अहमदनगर, नाशिक, बीड इ. जिल्ह्यासाठी पीक विमा –

आकोला जिल्ह्या- मुग, तूर, उडीद, कापूस, सोयाबीन या पिकासाठी पिक विमा दिला जाणार आहे.
अहमदनगर जिल्ह्या- भुईमुग, बाजरी, कापूस, सोयाबीन या पिकासाठी अहमदनगर जिल्ह्यातील लोक पात्र ठरवण्यात येणार आहेत.
नाशिक जिल्ह्या – मका, भुईमुग, बाजरी, कापूस, भात, नाचणी, कारळा, सोयाबीन या पिकांचा पिक विमा मिळणार आहे.
बीड जिल्हा- बीड जिल्ह्यामध्ये मुग, उडीद, सोयाबीन या पिकासाठी अधिसूचना काढण्यात आलेल्या आहेत.
जळगाव जिल्हा- जळगाव जिल्ह्यात आपण पाहिलं तर मुग, उडीद, बाजरी आणि कापूस या पिकांसाठी शेतकर्यांना २५ टक्के पिक विम्यासाठी पात्र ठरवण्यात येणार आहे.

वाचा –

नंदुरबार जिल्ह्या – भात, कापूस आणि सोयाबीन या पिकांचा पिक विमा पात्र असणार आहे.
बुलढाणा जिल्ह्या – बुलढाणा जिल्ह्यातील सर्व मंडळ सोयाबीन या पिकासाठी पात्र असणार आहेत. तर काही मंडळ मका आणि कापूस या पिकासाठी पात्र असणार आहेत.
औरंगाबाद जिल्हा – मका, कापूस, सोयाबीन या पिकासाठी अधिसूचना काढण्यात आलेल्या आहेत.

पुणे जिल्हा- बारामती आणि इंदापूर तालुक्यात्तील काही निवडक मंडळ बाजरी, भुईमुग, तूर, सोयाबीन या पिकासाठी पात्र झालेली आहेत.

धुळे जिल्ह्या– उडीद, ज्वारी, बाजरी, मुग या पिकासाठी पिक विमा दिला जाणार आहे.
सोलापूर जिल्हा- सोयाबीन, भुईमुग या पिकांसाठी शेतकर्यांना पात्र ठरवण्यात येत आहेत.
लातूर जिल्हा – लातूर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व मंडळ सोयाबीन या पिकासाठी पात्र आहेत.
गोंदिया जिल्ह्यात भात या पिकासाठी तर जालना जिल्ह्यात सोयाबीन या पिकासाठी लोक पात्र ठरणार आहेत.
सांगली जिल्हा- येथील लोक सुद्धा सोयाबीन या पिकासाठी पात्र असणार आहेत.
पालघर व रायगड जिल्ह्यामध्ये भात पिकासाठी पात्र असणार आहेत.

या जिल्ह्यातील अधिसूचना काढण्यात आलेल्या आहेत. शेतकर्यांना २५ टक्के आगावू पिक विमा दिवाळीच्या आधी दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button