कृषी बातम्या

Crop Insurance | रब्बी हंगामातही शेतकऱ्यांना एक रुपयात पीकविमा; जाणून घ्या कोणत्या पिकाला किती संरक्षण आणि अंतिम तारीख?

Crop insurance for farmers even in Rabi season at one rupee; Know how much protection and expiration date for which crop?

Crop Insurance | जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामातही एक रुपयात पीकविमा घेता येणार आहे. रब्बीतील गहू, ज्वारी, उन्हाळी भुईमूग, हरभरा या पिकांसाठी विमाहप्ता भरता येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ३० नोव्हेंबर (ज्वारी), १५ डिसेंबर (गहू, हरभरा, कांदा) आणि ३१ मार्च (उन्हाळी भुईमूग) या अंतिम मुदतीपर्यंत विमा कंपनीशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

किती मिळेल विमा संरक्षण?
रब्बी हंगामात गहू (बागायत) पिकासाठी ३३ हजार रुपये, ज्वारी (बागायत) पिकासाठी ३२ हजार ५०० रुपये, ज्वारी (जिरायत) पिकासाठी २३ हजार रुपये, हरभरा पिकासाठी ३० हजार रुपये, उन्हाळी भुईमूग पिकासाठी ४० हजार रुपये, रब्बी कांदा पिकासाठी ६५ हजार रुपये एवढी विमा संरक्षित रक्कम आहे. विमा भरण्यासाठी आधार कार्ड, बँक पासबुक, सातबारा व आठ अ उतारे स्वयंघोषणापत्र आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.

वाचा : Weather Update | शेतकऱ्यांनो राज्यात पावसाचा जोर वाढणार! 26 नोव्हेंबरपर्यंत जोरदार वारे अन् विजांसह पावसाचा इशारा; जाणून घ्या कोणत्या भागात?

काय आहे अट?
पिक पेरणीपूर्व किंवा लागवणपूर्व नुकसानीमध्ये अपुरा पाऊस, हवामानातील इतर प्रतिकूल घटकांमुळे अधिसूचित पिकाची त्या भागातील सर्वसाधारण क्षेत्राच्या ७५ टक्के क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी लागवड होऊ शकली नाही तर विमा संरक्षण मिळणार आहे. हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत पूर, पावसातील खंड, दुष्काळ इत्यादी बाबींमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पादनात उंबरठा उत्पादनाच्या ५० टक्क्यांहून अधिक घट अपेक्षित असेल, तर विमा संरक्षण मिळणार आहे.

काढणीपश्‍चात नुकसान
काढणीपश्‍चात चक्रीवादळ, अवेळी पाऊस यामुळे कापणी किंवा काढणीनंतर सुकविण्यासाठी शेतात पसरून ठेवलेल्या अधिसूचित पिकाचे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून नुकसान भरपाई दिली जाईल. काढणीपश्‍चात नुकसान, स्थानिक नैसर्गिक आपत्ती या बाबी अंतर्गत नुकसान भरपाई मिळण्यासाठी पिकांचे आकस्मिक नुकसान झाल्यास ७२ तासांच्या आत याबाबत केंद्र शासनाच्या पीकविमा ॲपवर संबंधित विमा कंपनी, कृषी किंवा महसूल विभाग किंवा टोल फ्री क्रमांकाद्वारे कळवावे.

शेतकऱ्यांसाठी पीकविमा ही एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना पिकाचे नुकसान झाल्यास आर्थिक मदत मिळते. रब्बी हंगामातही शेतकऱ्यांना एक रुपयात पीकविमा घेता येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळेवर विमा कंपनीशी संपर्क साधावा.

Web Title: Crop insurance for farmers even in Rabi season at one rupee; Know how much protection and expiration date for which crop?

हेही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button