Crop Insurance | शेतकऱ्यांना धक्का! या पीक साठी विमा योजनेत सहभागी होण्याची मुदत वाढली, पण…
Crop Insurance | Shock to the farmers! The deadline for participating in the insurance scheme for this crop has been extended, but…
Crop Insurance | तांत्रिक अडचणींमुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना फळ पीकविमा योजनेत विहित वेळेत सहभागी होण्यास अडचण येत होती. या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे मुदतवाढ मागितली होती. या मागणीला केंद्र सरकारने मंजुरी दिली असून केळी उत्पादक शेतकऱ्यांना 3 नोव्हेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी केळी उत्पादक शेतकऱ्यांना (Crop Insurance) विमा योजनेत सहभागी होण्यासाठी आवाहन केले आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत हवामान आधारित फळ पिक विमा योजनेमध्ये आंबिया बहार 2023-24 साठी केळी पिकाचा विमा योजनेत सहभागासाठी अंतिम दिनांक 31 ऑक्टोबर 2023 हा होता. 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत 45731 अर्जदारांनी केळीसाठी विमा योजनेत सहभाग घेतलेला आहे.
वाचा : Horoscope | शनीची चाल बदलणार; 4 राशींवर होणार परिणाम,जाणून घ्या सविस्तर …
केळी हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे फळ आहे. राज्यात केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. केळी पिकावर हवामानातील बदलांचा मोठा परिणाम होतो. यामुळे केळी पिकांचे नुकसान होऊ शकते. फळ पीकविमा योजनेमुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना हवामानातील बदलांमुळे झालेल्या नुकसानीपासून संरक्षण मिळेल.
मुदतवाढीमुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभागी होण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. यामुळे केळी पिकांचे नुकसान झाल्याची घटना घडल्यास शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ मिळेल.
हेही वाचा :
Web Title : Crop Insurance | Shock to the farmers! The deadline for participating in the insurance scheme for this crop has been extended, but…