Crop Insurance | आनंदाची बातमी! सव्वा लाख शेतकऱ्यांना 42 कोटी वाटप; पाहा तुम्हाला मिळाले का?
Crop Insurance | Good news! 42 crore distributed to half a lakh farmers; See if you got it?
Crop Insurance | खरीप हंगामात वेळेवर पाऊस न पडणे, अतिपाऊस अशा विविध कारणांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील खरीप विमा योजनेत (Crop Insurance) सहभागी झालेल्या दोन लाख २८ हजार ४४१ शेतकऱ्यांपैकी एक लाख २५ हजार ६०० शेतकऱ्यांना ४२ कोटी १३ लाख ९ हजार रुपयांची नुकसान भरपाईचे वाटप करण्यात आले आहे.
अजूनही एक लाख २ हजार ८४१ शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित
राज्य शासनाने शेतकऱ्यांना केवळ एक रुपया विमा हप्ता भरून खरीप पिकांचा विमा काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. ३१ जुलै ही अंतिम मुदत होती, जी नंतर ३ ॲगस्टपर्यंत वाढवण्यात आली होती.
ग्रामीण भागात अडचणी
मात्र, ग्रामीण भागात शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज भरताना सुविधा तत्पर न मिळाल्याने व कागदपत्रे मिळवताना आलेल्या अडचणीमुळे अनेक शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिले.
वाचा | Namo Shetkari Scheme | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दुसरा हप्ता ‘या’ तारखेला येणार खात्यावर
सर्वाधिक शिरूर तालुक्यात विमा
तरीसुद्धा पुणे जिल्ह्यातील दोन लाख २८ हजार ४४१ शेतकऱ्यांनी एकूण एक लाख २७ हजार ३३१ हेक्टर क्षेत्राचा पीकविमा काढला होता. यामध्ये सर्वात जास्त शिरूर तालुक्यातील एकूण ३९ हजार ९७६ शेतकऱ्यांनी विमा काढला होता.
विमा योजना राबविण्यात आली होती
जून-जुलै महिन्यात भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, तूर, मूग, उडीद, भुईमूग अशा विविध पिकांसाठी विमा योजना राबविण्यात आली होती. विम्यामुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पीक नुकसानीची भरपाई मिळणार होती. कर्जदार किंवा बिगर कर्जदार शेतकरी, कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत विमा काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.
Web Title | Crop Insurance | Good news! 42 crore distributed to half a lakh farmers; See if you got it?
हेही वाचा