ताज्या बातम्या

Crop Insurance | अर्रर्र..! ‘या’ जिल्ह्यातील ४१ पैकी केवळ चार महसूल मंडळांना मिळणार विमा परतावा

Arrrr..! Only four revenue boards out of 41 in 'Ya' district will get insurance refund

Crop Insurance | अमरावती जिल्ह्यातील सात तालुक्यातील सोयाबीन पिकाच्या नुकसानीचा अंदाज ४१ महसूल मंडळांसाठी सरासरी उत्पादनापेक्षा ५० टक्के कमी असल्याचे जिल्हास्तरीय समितीने दिलेल्या अहवालातून स्पष्ट झाले होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी विमा कंपनीला २५ टक्के अग्रिम देण्याचे आदेश दिले होते. मात्र, विमा कंपनीने केवळ अंजनगावसुर्जी तालुक्यातील चार महसूल मंडळांसाठी परतावा देण्याची तयारी दर्शविली आहे.

शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रिम परतावा
अग्रिम पीक विमा योजने अंतर्गत, पावसाच्या खंडामुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रिम परतावा दिला जातो. ऑगस्ट महिन्यात पावसाने खंड दिल्याने अमरावती जिल्ह्यातील सात तालुक्यातील सोयाबीन पिकाची स्थिती अतिशय वाईट झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी अग्रिम परतावा देण्याची मागणी केली होती.

वाचा : Crop Insurance | अर्रर्र..! कापसाला अग्रिम नुकसान भरपाई देण्यास विमा कंपनीचा नकार; ‘या’ पिकांसाठी दर्शवली तयारी

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सातही तालुक्यातील सोयाबीन पिकाचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात ४१ महसूल मंडळांत सरासरी उत्पादनापेक्षा ५० टक्के कमी उत्पादन येण्याचा अहवाल देण्यात आला होता. मात्र, विमा कंपनीने संयुक्त समितीच्या अहवालावर आक्षेप घेतला होता. त्यावर झालेल्या सुनावणीत सर्व आक्षेप फेटाळण्यात आले होते. जिल्हास्तरीय समितीने आक्षेप फेटाळल्यानंतर आता विमा कंपनी विभागीय समिती व नंतर राज्य तसेच केंद्राकडे आक्षेप दाखल करणार आहे. यामागे कंपनीचे वेळकाढू धोरण असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे.

उत्पादन ५० टक्क्यांपेक्षा कमी
विमा कंपनीने अंजनगावसुर्जी तालुक्यातील चार महसूल मंडळांतच नुकसान झाल्याचे व उत्पादन ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे मान्य केले आहे. दर्यापूर तालुक्यात उत्पादन सरासरी ५० टक्क्यांपेक्षा कमी नसल्याचा दावा केला आहे. याशिवाय धारणी, चिखलदरा, धामणगावरेल्वे, चांदूररेल्वे, भातकुली या पाच तालुक्यात खंड नसल्याचा दावा करून या पाचही तालुक्यातील २७ महसूल मंडलांना अग्रिम नाकारला आहे. शेतकऱ्यांच्या मते, विमा कंपनीचे हे वेळकाढू धोरण आहे. कंपनीला शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची घाई नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या धोरणाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

कंपनीचे आक्षेप
दर्यापूर व अंजनगावसुर्जी तालुक्यांत पीकविमा कंपनी व विभागाच्या उत्पादनात तफावत आहे. भातकुली, चांदूररेल्वे, चिखलदरा, धामणगावरेल्वे व धारणी या तालुक्यांतील २७ महसूल मंडलांत परताव्याचे निकष लागू होत नाहीत. या तालुक्यांमध्ये सर्वेक्षणाचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही.

शेतकऱ्यांचा संताप
विमा कंपनीच्या या निर्णयावर शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. विमा कंपनीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान होणार आहे, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

हेह वाचा :

Web Title: Arrrr..! Only four revenue boards out of 41 in ‘Ya’ district will get insurance refund

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button