Cotton Rate | देशातील कापूस दर आता नरमले आहेत. कापसाच्या दरात (Cotton Rate) चढ उतार सुरू आहे. या परिस्थितीत सुताला मागणी कमी असल्यामुळे सूतगिरणीने सवलतीत विक्री सुरू केली आहे. मात्र, तरी देखील सूतगिरण्यांना (Agriculture) अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगितलं जातं आहे. पण सवलत देऊनही सुताला मागणी का वाढली नाही? सध्या कापसाला (Cotton Market) काय दर मिळत आहे, तसेच पुढील काळात कापसाचे दर काय राहू शकतात. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
वाचा: हिवाळ्यातही बरसणार मेघराजा! राज्यात ‘या’ तारखेपासून होणार पाऊस, जाणून घ्या कुठे?
कापसाचे दर
सध्या कापसाचे दर कमी झाले आहेत. मात्र, तरीही कापड उद्योगाकडून सुताला कमी उठाव असल्याने देशातील सूतगिरण्यांकडे सुताचा मोठा साठा पडून असल्याचे सांगितलं जातंय. सुताला सवलतही देत आहेत. मात्र तरीही सुताची मागणी अपेक्षेप्रमाणे वाढलेली नाहीये. सुताचे दर कमी झाल्यानंतर मागणी वाढेल किंवा कापड बाजारात चैतन्य आल्यानंतर सुताला मागणी येईल असं सांगितलं जात आहे. मात्र सुताचे दर हे कापसाच्या दरावर थेट अवलंबून असतात.
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे तब्बल 86 कोटी जमा
बाजारातील कापसाची आवक
चालू हंगामात नोव्हेंबर महिन्यात कापूस दरात 9 हजार 500 रुपयांचा टप्पा गाठला होता. मात्र, सध्या दर 8 हजार 500 ते 9 हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. कापसाचे (Cotton Rate) दर नरमले तशी बाजारातील कापूस आवक देखील कमी झाली. देशातील बाजारात (Farming) एरवी दैनंदिन सरासरी दोन ते सव्वा दोन लाख गाठींच्या दरम्यान आवक असते. मात्र, सध्या केवळ एक ते एक लाख दहा हजार गाठींच्या दरम्यान आवक होती.
वाचा: ब्रेकींग! शेतकऱ्यांवर आता वीज दरवाढीचं मोठं संकट; युनिटामागं होणारं ‘इतक्या’ रुपयांची वाढ
शेतकऱ्यांच्या विक्रीवर कापसाचे दर टिकून
दर कमी झाल्यामुळे या दरात कापूस विकण्यास शेतकरी (Agricultural Information) तयार नाहीत. अपेक्षित दर मिळाल्यानंतरच कापूस विकू असा पवित्रा सध्या शेतकऱ्यांनी घेतलाय. त्यामुळे कापसाचे दर जास्त नरमले नाहीत. तर देशातील कापूस दर सध्या आंतरराष्ट्रीय बाजारातील दरापेक्षा जास्त आहे. तसेच शेतकऱ्यांच्या कापूस विक्रीवरच (Cotton sale) कापसाचे दरही टिकून असल्याचे जाणकारांनी सांगितले आहे.
कापसाचे दर सुधारणार
बाजारात या परिस्थितीत कापसाची आवक वाढल्यास दर दबावत येऊ शकतात. मात्र, शेतकऱ्यांनी कापसाची मर्यादित विक्री केल्यास दर टिकून राहतील. चालू महिना कापूस बाजारासाठी खूप महत्त्वाचा आहे. डिसेंबरमध्ये कापूस दरात चढ उतार होऊ शकतात. मात्र, बाजारातील आवक कमी राहिल्यास पुढील महिन्यात कापूस जर सुधारतील असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा:
- नव्या युगातील ‘या’ 5 पिकांतून मिळेल एकरी प्रचंड नफा, परदेशातूनही आहे मागणी
- कर्ज घेण्याचा विचार करताय? ‘या’ 5 बँका देत आहेत सर्वात स्वस्त कर्ज; जाणून घ्या सविस्तर
Web Title: Good news! Cotton prices to rise next month; Know how the market will be in the current month?