Cotton | ब्रेकिंग न्युज: आत्ता मिळणार पैसा च पैसा..कापसाचे होणार भरघोस उत्पादन उत्पादन ! ‘ हे ‘ नवीन वाण विकसित ..!
कापसाची लागवड –
कापसाची लागवड (Cotton Cultivation) संपूर्ण भारत वर्षात केली जाते. महाराष्ट्रातील बहुतांशी शेतकरी बांधव (Farmer) कापूस पिकाची शेती करत असतात. राज्यातील खानदेश ( khandesh) , मराठवाडा ( Marathwada) , विदर्भ ( Vidarbha) , पश्चिम महाराष्ट्र या विभागातील शेतकरी कापूस पिकावर अवलंबून आहेत . खरीप हंगामाचा विचार करता कापूस हे पीक शेतकऱ्यांचा प्रमुख आर्थिक दृष्टीने आधारस्तंभ असून शेतकऱ्यांचे बरेचसे आर्थिक स्थिती त्यावर अवलंबून आहे.
वाचा: अरे बाप रे! आता महाराष्ट्रात थंडीत देखील पडणार पाऊस ; हवामान खात्याने वर्तवला अंदाज
कापसाचे शेतकरी त्रस्त –
कापसाचे उत्पादन कमी होत चालले आहे. बऱ्याच ठिकाणी कापसाच्या पिकावरती रोगराई ( pest and disease) व किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी त्रस्त झाले असून उत्पादनात देखील घट येत आहे.अतिवृष्टी मुळे देखील उत्पन्नात मोठी घसरण झाली आहे .परंतु या सगळ्या पार्श्वभूमीवर एक कापसाच्या बियाण्याबाबत महत्वाचे अपडेट समोर आली असून कापसाचे उत्पादन वाढावे या दृष्टिकोनातून महाबीजने एक नवीन बियाणे विकसित केले आहे. या बियाण्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ.
कापसाचे नवीन वाण विकसित –
महाबिजने महाबीज १२४ बीजी 2( BG -2 variety Cotton ) हे कापसाचे नवीन संकरित वाण विकसित केले आहे. याबद्दल महत्वाचे म्हणजे कृषी पिकांसाठी वाणाना मंजूरी देणाऱ्या पीक मानांकन केंद्रीय उपसमितीच्या 88 व्या बैठकीत नुकतेच महाबीजच्या या विकसित वाणाला राज्यात व्यावसायिक लागवडीसाठी मान्यता देण्यात आली आहे.
नवीन वाणी चे फायदे –
महाबिजने कापसाचे नवीन बियाणे विकसित केले असून हे नवीन संकरित बियाणे रस शोषक किडींना प्रतिरोधक असून या कपाशीच्या नवीन वाणाला राज्यात व्यावसायिक वाढीसाठीची मान्यता देखील देण्यात आली आहे. महाबिजने विकसित केलेले हे बियाण्याची बोंडे आकाराने मोठे असून या माध्यमातून शेतकऱ्यांना कापसाचे अधिक उत्पादन मिळणे शक्य होणार.जर आपण कापूस पिकाचा विचार केला तर सर्वात जास्त फवारणीचा खर्च हा रस शोषक किडींच्या नियंत्रणासाठी करावा लागतो. परंतु हे वाण रस शोषक किडींना प्रतिरोधक असल्यामुळे शेतकरी बंधूंचा उत्पादन खर्च देखील वाचणार आहे.कापूस उत्पादक शेतकऱ्यांची गेल्या अनेक वर्षापासूनची अधिक उत्पादन देणाऱ्या कापसाच्या नवीन जातीची मागणी त्यामुळे आता पूर्ण होणार आहे. महाबिजने तयार केलेले हे नवीन वाण शेतकऱ्यांसाठी निश्चितच फायद्याचे ठरणार असून पुढील खरीप हंगामापासून शेतकऱ्यांना ते उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांना पीक प्रात्यक्षिकासाठी हे वाण येत्या खरीप हंगामापासून उपलब्ध केले जाणार आहे .
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा: