कृषी बातम्या

Cotton Rate | शेतकऱ्यांनो कापूस आणि सोयाबीनच्या दरात होणार वाढ? जाणून घ्या सविस्तर

Cotton Rate | खरिपातील पिके काढणीला आली आहे. हंगामातील प्रामुख्याने शेतीत (Agriculture) घेतली जाणारी पिके म्हणजे कापूस आणि सोयाबीन होय. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत महागाईचा (Financial) फटका बसून मार्केटमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहे. ज्याचा कुठे ना कुठे फटका भारतीय बाजारपेठेला बसत आहे. याचं पार्श्वभूमीवर बाजारात असलेल्या कापूस आणि सोयाबीनच्या दरावर (Soybean Rate) याचा काय परिणाम होऊ शकतो तसेच आगामी काळात कापूस (Cotton Rate) आणि सोयाबीनचा दर दराची स्थिती काय राहू शकते हे जाणून घेऊयात.

वाचा: आनंदाची बातमी! कापसाला प्रतिक्विंटल 11 हजारांचा मिळाला भाव; जाणून घ्या आगामी काळात कसा असेल बाजारभाव?

कसे असतील कापसाचे दर?
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार आता कापसाला चांगला दर मिळत आहे. परंतु कापसासाठी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिना विक्रीसाठी महत्वाचा असतो. कारण नवा कापूस या महिन्यात बाजारात दाखल होतो. ज्यामुळे बाजारात कापसाची आवक वाढते. आवक वाढल्याने बाजारात उद्योगही खरेदीसाठी उतरतात. मात्र, आवक वाढल्याने बाजारातील दर नरमतात. दुसरीकडे अमेरिकेत कापसाचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे भारताला कापसाच्या दराबाबत चांगली संधी मिळू शकते. यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विक्रीची घाई करू नये.

कापसाची दरवाढ होण्याचा अंदाज घेऊनच टप्प्याटप्प्याने कापसाची विक्री करावी.तर तज्ञांच्या मते यंदा कमीत कमी कापसाला 8 हजार ते 8 हजार 500 रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळू शकतो. तर हा दर जास्तीत जास्त वाढू ही शकतो.तर शेतकऱ्यांना कापसाच्या दराबाबत दिलासा मिळू शकतो.

वाचा: शेतकऱ्यांची चांदी! उडदाला मिळतोय तब्बल ‘इतका’ भाव; जाणून घ्या तूर, कांदा आणि सोयाबीनचे ताजे दर

सोयाबीनचे दराची स्थिती कशी राहील?
यंदा बाजारात सोयाबीनचे दर नरमले आहेत. तर दुसरीकडे खरीप हंगामातील सोयाबीनचे पीक काढणीला आले आहे. परंतु, यंदा अतिवृष्टीमुळे पिकाचे प्रचंड नुकसान देखील झाले आहे. सध्या देखील परतीचा पाऊस पडत असल्याने सोयाबीन काढणीला विलंब होतोय. नवा सोयाबीन बाजारात नेल्याने तो ओला, काड्या कचरा असल्याने कमी दर मिळत आहे. तर तुलनेत जुन्या सोयाबीनला चांगला दर मिळत आहे.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! नुकसानग्रस्तांसाठी तब्बल 132 कोटींच्या निधी वितरणास मान्यता; जाणून घ्या कधी होणार खात्यात जमा

परंतु यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच ही परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. तज्ञांच्या मते सोयाबीनची आवक यंदा वाढल्याने याचा परिणाम उत्पादनावर होऊ शकतो. त्यामुळे सोयाबीनला कमीत कमी 4 हजार 500 ते 5 हजार रुपये इतका दर मिळू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंतेत राहू नये. तसेच टप्प्याटप्प्याने विक्री केल्यास सोयाबीनला देखील चांगला दर मिळू शकतो, असेही तज्ञ सांगतात.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Farmers will increase the price of cotton and soybeans Know in detail

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button