राज्यात कोरोनाचा ‘विळखा’ अधिकच घट्ट आली नवीन लॉकडाऊनची नियमावली..
राज्यात कोरोनाचा वेग अधिकच वाढत चालला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन बद्दल नागरिकांमध्ये संभ्रमाची भावना निर्माण झाली आहे. त्यातच, सरकारने लॉकडाऊन बाबतची, नवीन नियमावली जाहीर केले आहे. या आठवड्यात रुग्णांची संख्या वाढली असून गेल्या तीन दिवसांपासून राज्यात पंधरा हजार पेक्षा जास्त रुग्ण संख्या आढळून आली.
चला तर मग पाहूया सरकारची काय आहे नवीन नियमावली:
👉 लग्नसमारंभासाठी 50 लोकांना परवानगी असेल.
👉 अंत्यसंस्कारासाठी वीस लोकांची परवानगी ग्राह्य.
👉 राज्यातील सर्व रेस्टॉरंट, सिनेमागृह (single screen and multiplex) 50% क्षमतेने सुरू राहतील. मात्र यावेळी मास्क शिवाय प्रवेश दिला जाणार नाही. तसेच सॅनिटायझर लावूनही बंधनकारक आहे.जर नियमाचे उल्लंघन केल्यास, कोरोनाची साथ जाईपर्यंत ते रेस्टॉरंट आणि थेटर करण्याचा निर्णय घेण्यात येईल.
👉 याशिवाय शॉपिंग मॉल ही हे नियम लागू आहेत.
कोरोनाच्या या काळामध्ये, अत्यंत काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. सोशल डस्टिंग चे पालन करा, मास्क चा वापर करा. वारंवार आपले हात स्वच्छ धुवा.
अशाच प्रकारच्या योजना, शेती विषयक माहिती, शेती पूरक व्यवसाय, शेती तंत्रज्ञान, यावर माहिती घेण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करा… https://t.me/farmersdigitalmagazineMI