कोरोनाचे थैमान! पुन्हा एकदा महाराष्ट्राला लॉक डाऊन चा विळखा…?
Corona's Thaman! Once again, lock down Maharashtra
पुन्हा एकदा कोरोना मोठ्या प्रमाणावर फैलावत चालला आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत चालले असल्यामुळे राज्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकारकडूनही काही भागात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. सरकारकडून वेळोवेळी सूचना देऊनही लोक नियमांचे उल्लंघन करताना दिसतात. त्यामुळे कॊरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. कोरोनाचे सर्वात जास्त प्रमाण पुणे-मुंबई औरंगाबाद मध्ये आहे. तसेच राज्यातील इतरही भागात कॊरोनाची संख्या हळूहळू झपाट्याने वाढत आहे. दररोज कोरोना बाधित लोकांची संख्या वाढत राहिल्यास कठोर निर्बंध तसेच लोकडाऊन ची स्थिती निर्माण होईल.तसेच होळी,रंगपंचमी सारखे सन साजरे करण्यावर केंद्र सरकारने निर्बंध घातले आहेत.
आज कॅबिनेट राज्य मंत्री मंडळाची बैठक असून संपूर्ण राज्याचे लक्ष त्याच्याकडे लागून आहे. यामधील दोन महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार असून, लॉकडाऊन की कडक निर्बंध यावर चर्चा होणार आहे. तसेच महाराष्ट्रातील काही भागांमध्ये नांदेड, अमरावती ,नागपूर, अकोला,बीड येथे लोकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. बीडमध्ये 25 मार्च पासून 4 एप्रिल पर्यंत लॉकडाउन जाहीर झाले आहेत.
पुणे,मुंबई,औरंगाबाद मध्ये सर्वात जास्त कोरोनाग्रस्त आहेत. पुणे ग्रामीण विभाग कोरोना हॉस्पॉट करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी आरोग्यमंत्री पुणे दौऱ्यावर आले होते. तेव्हा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी देखील असे सूचित केले होते की, कॊरोनाग्रस्तची संख्या अशीच वाढत राहिली तर महाराष्ट्र मध्ये लॉकडाऊन चे संकेत दिले होते.