Corona New Variant | कोरोनाचा नवा टप्पा ? भारतात दाखल झाला जेएन १ व्हेरिएंट, तुमच्या आरोग्यासाठी किती धोकादायक? वाचा तज्ज्ञांचे मत!
Corona New Variant | A new phase of Corona? JN 1 variant introduced in India, how dangerous for your health? Read the opinion of experts!
Corona New Variant | जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोनाच्या नव्या सब-व्हेरिएंट जेएन १ ला ‘व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट’ म्हणून वर्गीकृत केले आहे. यामुळे चिंता वाढली असली तरी, लोकांना मोठ्या प्रमाणात धोका नाही, असेही WHO ने स्पष्ट केले आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या लसच्या या (Corona New Variant) व्हेरिएंटवर प्रभावी असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
मात्र, गेल्या काही दिवसांपूर्वी दक्षिण भारतातून परतलेल्या गुजरातमधील गांधीनगर येथील दोन महिलांना या व्हेरिएंटचे संक्रमण आढळले आहे. त्यांना सध्या होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. केरळमध्ये या व्हेरिएंटचे रुग्ण आढळल्यानंतर दक्षिण भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष ठेवली जात आहे. या दोन्ही महिलांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यांना गेल्या दोन-तीन दिवसांपासून सर्दी आणि खोकल्यासारखी लक्षणे होती. या दोन्ही महिलांनी कोरोना लसीचे दोनही डोस घेतले आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू आहे.
अमेरिकेत पहिला रुग्ण ८ डिसेंबरला
यूएस सेंटर फॉर डिजीज कंट्रोल एन्ड प्रिवेंशन (CDC) नुसार, ८ डिसेंबरपर्यंत अमेरिकेत वाढलेल्या कोरोना रुग्णांपैकी १५ ते २९ टक्के रुग्णांसाठी जेएन १ व्हेरिएंट जबाबदार आहे. हा व्हेरिएंट सप्टेंबरमध्ये पहिल्यांदा ओळखला गेला होता. चीनमध्येही गेल्या आठवड्यात या व्हेरिएंटचे ७ रुग्ण आढळले आहेत.
वाचा : Stale Rice | शिळा भात खाताय? मग ही बातमी नक्की वाचा! अनेक आजारांना देताय निमंत्रण!
काळजी आणि खबरदारी आवश्यक
WHO लोकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे. गर्दीच्या ठिकाणी, बंद जागांमध्ये आणि हवेचा संचार नसलेल्या ठिकाणी मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे यासारख्या उपाययोजनांची शिफारस करण्यात आली आहे. आरोग्य कर्मचारी आणि वैद्यकीय सेवांशी संबंधित लोकांनाही मास्क, पीपीई किट वापरणे, कोविड पॉझिटिव्ह रुग्णांची योग्य प्रकारे काळजी घेणे आणि व्हेंटिलेटरसारख्या सुविधा तत्परतेने उपलब्ध करून ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तज्ज्ञांचे मत
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, जेएन १ व्हेरिएंटमुळे मोठ्या प्रमाणात संक्रमण किंवा गंभीर आजार होण्याची शक्यता कमी आहे. कारण या व्हेरिएंटमधील लक्षणे ओमिक्रॉनसारख्या गंभीर नसून सौम्य आहेत. यावर सध्याच्या लसींचाही परिणाम होतो. मात्र, संसर्गाचा धोका टाळण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे.
Web Title : Corona New Variant | A new phase of Corona? JN 1 variant introduced in India, how dangerous for your health? Read the opinion of experts!
हे वाचा :