कृषी बातम्या

कोरोनामुळे शेतकऱ्यांच्या फुलशेतीला सुद्धा मोठा फटका… वाचा सविस्तरपणे….!

Corona also hits farmers' floriculture… Read in detail….!

महाराष्ट्रात (In Maharashtra) अनेक प्रसिद्ध देवस्थाने आहेत. त्यातील प्रमुख देवस्थाने ही पश्चिम महाराष्ट्रात पुणे आणि नगर जिल्ह्यामध्ये येतात. (Comes in Pune and Nagar districts) कोरोना मुळे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र ही बंद आहेत तसेच पर्यटन स्थळे सगळीकडे बंद आहेत. ज्याकाळी लग्न समारंभ (Wedding ceremony) हे धूमधडाक्यात साजरे होत होते, आता ते फक्त वीस लोकांच्या मध्ये साजरे करावे लागत आहेत. या सर्व गोष्टींचा मोठा प्रभाव हा फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या वर पडलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. फूल उत्पादक (Flower grower) हा आता आर्थिक दृष्ट्या (Financially) कमकुवत झाला आहे.

मागच्या लॉकडाऊन (Lockdown) नंतर फूल उत्पादक शेतकऱ्यांना आशा होती की आता करणार नष्ट झाला आता मंदिरे उघडी होतील, तसेच सण समारंभ हे साजरे होतील. पर्यटन स्थळ (Tourist destination) चालू झाले तर फुलांना, तसेच फुलांपासून बनणारे गजरा, हार भाविक खरेदी करत असतात. याचा विचार करूनच फुल उत्पादकांनी आपली शेती बनवणे सुरुवात केली होती. त्यांच्या फुल शेती ने एक वेगळाच सुगंध त्यांच्या जीवनामध्ये येणार होता. काही काळ बाजार भाव फुलांना चांगला मिळत होता तसेच, बाजारामध्ये मागणीही चांगली वाढू लागली होती. परंतु वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा हळू हळू निर्बंध लावण्यास सरकारने (Government to impose restrictions) सुरुवात केली.

शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास लॉकडाऊन मध्ये पूर्ण विरघळून गेला. तोडणीला हाताशी आलेली फुले पुन्हा कोमेजून जाऊ लागली. एकीकडे मागणी कमी असताना बाजार भाव मिळत नाहीये. तर दुसरीकडे भर उन्हाळ्यात फुलवलेली फुलशेती अवकाळी पावसामुळे मोडतोड झाली. त्यामुळे शेतकरी राजाला भारी आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत आहे. शेतकरी कासावीस होऊन गेला आहे. फुल शेती वर होणारा खर्च जास्त (The cost is high) असल्यामुळे तो खर्च वसूल होत नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांची परमेश्वराकडे एकच मागणी दिसून येत आहे, उघड देवा दार आता…!.

हे ही वाचा…

2रासायनिक खत वाढीमुळे शेतकऱ्यांचे,आर्थिक गणित कोलमडणार! वाचा सविस्तरपणे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button