सध्या पेट्रोल, (Petrol) डिझेल आणि गॅसची दरवाढ आभाळाला भिडली आहे. कोरोनाच्या काळामध्ये जीवनावश्यक वस्तूंची महागाई मोठ्या प्रमाणात वाढली. दिवसेंदिवस खाद्य तेलाच्या किमती देखील मोठ्या प्रमाणात वाढत चालल्या आहेत. परंतु या वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी मोदी सरकारने (Modi government) खाद्यतेलाच्या किमतींमध्ये घट व्हावी याकरता मोठे पाऊल उचलले आहे. मोदी सरकारने पाम तेलासह विविध खाद्यतेलावरील आयात शुल्कात प्रती टन ८००० रुपयांची कपात केली आहे.
हेही वाचा : LPG Gas Cylinder मिळणार फक्त नऊ रुपयात! पहा : इंडियन ऑईल व पेटीएम कंपनीची कोणती आहे,’ ही ‘ मोठी ऑफर…
खाद्यतेलाचे दरवाढीचे प्रमुख कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर खाद्यतेलाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे याचा परिणाम भारतामध्ये देखील पाहण्यास मिळत आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क विभागाने शुल्क कपातीची अधिसूचना जारी (Central Indirect Taxes and Customs Department issues notification of reduction of duties ) केली आहे. त्यानुसार क्रूड पाम तेलाचे आयात शुल्क (Import duty) प्रती टनामागे ८६ डॉलर्सनी कमी करण्यात आले आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत खाद्य तेलाच्या किमती जवळ-जवळ दुपटीने वाढल्या असून, आधीच कोरोना (Corona) चे संकट व त्यामध्ये महागाईचा (Inflation) भडका यामुळे सर्वसामान्य जनतेचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे.
हेही वाचा : किमतीपेक्षा अधिक दराने खताची विक्री केल्यास कारवाई होणार; कृषी विभागाकडून इशारा!
केंद्र सरकारने (Central Government) तातडीच्या आणि दीर्घकालीन उपाययोजना करुन खाद्यतेलाचे (Of edible oil) दर नियंत्रणात आणले जातील, असे आश्वासन दिले होते. सोयाबीन तेलाच्या (Of soybean oil) आयात शुल्कात सरकारने प्रती टन ३७ डॉलरची कपात केली असून, पाम तेलावरील आयात शुल्क प्रती टनामागे ११२ डॉलर्सने घट करण्यात आली आहे.
हेही वाचा :