गुंतवणूकीपूर्वी ह्या गोष्टी लक्षात घ्या; चला तर वाचूया इन्वेस्टमेंट स्मार्ट टिप्स…
Consider these things before investing; Let's read Investment Smart Tips
दिवसेंदिवस महागाई गगनाला भिडलेली आहे, या महागाईच्या काळामध्ये योग्य ठिकाणी गुंतवणूक (Investment) करणे फायद्याचे ठरते, अलीकडील काळामध्ये गुंतवणुक करण्याकरिता बरेचसे पर्याय उपलब्ध आहेत, पूर्वीच्या काळी गुंतवणूक जमीन, सोने, किंवा बँकेमधील फिक्स डिपॉझिट (Fixed deposit) यामध्ये मोठ्या प्रमाणात होत असे, मात्र आता, एस आय पी, (SIP,) मॅच्युअल फंड, (Mutual fund,) ब्लू चिप्स, शेअर मार्केट (Stock market) अशा गोष्टींमध्ये देखील इन्व्हेस्टमेंट करता येते.
चला तर आपण पाहू यात गुंतवणूक करण्यापूर्वी इन्व्हेस्टमेंट च्या स्मार्ट टिप्स.. आज काल सर्वच शेअर मार्केट मध्ये म्हणजेच इक्विटी मार्केट मध्ये पैसे गुंतवत आहेत, कमी वेळेत लवकर श्रीमंत होण्याचा हा दृष्टीकोन मुळातच चुकीचा आहे, योग्य ज्ञानाच्या अभावी यामध्ये आपल्याला मोठे नुकसान होण्याची देखील शक्यता आहे, गुंतवणूक करताना संयमाने, शिस्तबद्ध, व जोखीम लक्षात घेऊन गुंतवणूक करणे केव्हाही फायद्याचे ठरेल.
हेही वाचा: दुधातील फॅट कमी झाले आहेत का? दुधातील फॅट वाढविण्यासाठी करा, ‘ह्या’ उपाय योजना…
महागाई लक्षात घेऊन,आपणास सध्य असणारी रक्कमेचे मूल्य लक्षात घ्यावे उदाहरणार्थ आज एक कोटी रुपयाचे बाजारात जेवढे मूल्य आहे, तेवढे वीस वर्षानंतर राहील का याचा विचार करायला हवा? म्हणजेच महागाईमुळे याचे मूल्य कमी होऊ शकते,जर चलनवाढीचा दर 5 टक्के असेल तर 15 वर्षानंतर 1 कोटीचे मूल्य 48 लाख होईल. त्याचबरोबर 20 वर्षानंतर त्याचे मूल्य 37.68 लाख असेल, 25 वर्षानंतर 29.53 लाख आणि 30 वर्षानंतर हे मूल्य 23.13 लाख होईल. याची गणना करण्यासाठी महागाईचा दर 5 टक्के ठेवण्यात आला आहे.
संपत्ती ही फुकटच्या सल्ल्यावर कधीही मिळवता येत नाही. त्यासाठी स्वतःचा वेळ आणि पैसा घालवून अभ्यास आणि संशोधन करावेच लागते, त्याकरिता दुसऱ्यांचे सल्ले ऐकत बसू नका, योग्य वेळी योग्य निर्णय घेऊनच आपल्या कष्टाचा पैसा इन्वेस्ट करा.
हेही वाचा: “या” ट्रॅक्टरमुळे होणारे शेतकऱ्यांचे भरघोस फायदा! जाणून घ्या सविस्तरपणे…
जाणून घ्या; “वांगी लागवड” विषयी संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर… https://t.co/DsQcmcAc0r
— मी E-शेतकरी (@DbkgYario9KI3SD) June 24, 2021
हेही वाचा:
2. मोबाईलवर शेतकऱ्यांना मिळणार हवामान अंदाज सह कृषी सल्ला पहा त्यासाठी काय करायचे?