ताज्या बातम्या

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे समाजातील घटकांमध्ये संभ्रम: रोहित पवार यांनी काय म्हटले पहा सविस्तर…

दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा वाढत चालत असल्याने समाजातील अनेक घटकांमध्ये अगदी, शेतकरीवर्गा पासून ते व्यापारी वर्गापर्यंत संभ्रम पाहण्यास मिळत आहे. पुण्यामध्ये काही दिवसांपूर्वी व्यापाऱ्यांनी असे म्हटले आहे,की काटेकोर नियमांचे पालन करतो. परंतु लॉकडाऊन नको. अशी मागणी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली.

कोरोनाच्या काळामध्ये शेतकरी तथा व्यापारी वर्गाला चांगलाच फटका बसला. आर्थिक झळ सोसावत असताने हा वर्ग पुन्हा उभा राहण्यासाठी प्रयत्न करतोय, तर पुन्हा लॉकडाउन करण्याची वेळ येते की काय? अशी भीती वर्गामध्ये आहे.

रोहित पवार यांनी ट्विट करून असे म्हटले आहे की, ‘लॉक डाउन बाबत अनेक घटकांमध्ये संभ्रमाची भावना आहे. कोरोना रोखण्यासाठी लॉक डाऊन (Lockdown) हा पर्याय नसून लसीकरणा सोबत लोकांनी कटिबद्ध नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. लॉकडाउन पुन्हा सुरू होणे हे राज्यासह सर्वसामान्य लोकांना पूरक नाही असे मला वाटते.’

सर्वात मोठी रुग्ण वाढ
राज्यात कोरूना चा विकास सर्वात जास्त राजधानी मुंबई उपराजधानी नागपूर तर सांस्कृतिक राजधानी पुणे या शहरांमध्ये अधिक विळखा दिसतो. चोवीस तासांमध्ये तब्बल सोळा हजार 620 नवे रुग्ण आढळले. त्यामध्ये मुंबई 1962, पुणे 1740, नागपूर 2252 रुग्णांचा समावेश आहे. आणखीन आकड्यांमध्ये वाढ होण्याआधी जनतेने सावधान होणे गरजेचे आहे. अन्यथा सर्वांनाच परत एकदा लॉकडाउन सारख्या परिस्थितीला सामोरे जावे लागेल व आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल. कोरोनापासून बचाव होण्यासाठी आपण वेळोवेळी मास्क चा वापर करा. तसेच दोनफुटाचे अंतर ठेऊन सार्वजनिक ठिकाणी बोला.

काय करता येईल
 सार्वजनिक ठिकाणी नियमांचे काटेकोर पालन करावे.
 हात वेळोवेळी साबणाने व पाण्याने स्वच्छ धुवावे.
 वारंवार तोंड डोळे नाक यांना हात लावू नये.

WEB TITLE: Confusion among the sections of the society due to the increasing prevalence of corona: see what Rohit Pawar said in detail…

अशाच प्रकारच्या योजना, शेती विषयक माहिती, शेती पूरक व्यवसाय, शेती तंत्रज्ञान, यावर माहिती घेण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करा…  https://t.me/farmersdigitalmagazine

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button