” मागेल त्याला शेततळे “योजनेची संपूर्ण माहिती, अटी, तसेच कसा कराल अर्ज?
Complete information, terms and conditions of "Magel Tyala Shettale" scheme, as well as how to apply? View in one click
💧 राज्य सरकार व केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असतात. त्यातलीच एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे ‘मागेल त्याला शेततळे ‘योजना होय,ही योजना फेब्रुवारी 2016 रोजी राज्य मंत्रिमंडळात मंजूर झाली. या योजनेसाठी साधारणपणे दहा हजार कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आली.
💧या योजनेचे एकमेव उद्दिष्ट असाही टंचाईग्रस्त भागामध्ये पाण्याचा स्त्रोत निर्माण करणे होय. तसेच तेथील जमीन लागवडीकरीता आणण्याचे उद्दिष्ट सरकारचे होते. यासाठी या योजनेचे आयोजन केले आहे. शेती उत्पन्नामध्ये शाश्वत आणण्यासाठी तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे उपयुक्त ठरते.
💧या योजनेअंतर्गत सर्वसाधारण सर्वात मोठ्या आकाराचे शेततळे 30×30×3 मीटर असून सर्वात कमी 15×15×3 इतक्या आकार मानाचे असेल.
30×30×3 मीटर शेततळ्यासाठी रुपये 50,000 हजार इतके किमान अनुदान देण्यात आले आहे. 50 हजार पेक्षा जास्त खर्च झाल्यास उर्वरित रक्कम लाभार्थ्याने स्वता: करावयाचे आहे. शेततळ्याची मागणी करण्यासाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावे लागेल.
शेततळ्याच्या अटी*:
1) कृषी विभागाने म्हणजेच कृषी सहाय्यक कृषी सेवक यांनी निश्चित केलेल्या ठिकाणी शेततळे करणे बंधनकारक आहे.
2) शेततळ्याचे काम तीन महिन्यात पूर्ण करणे बंधनकारक राहील.
3) शेततळ्याच्या बांधावर व पाण्याच्या प्रवाहाच्या भागामध्ये स्थानिक प्रजाती वनस्पतीची लागवड करावी तसेच शेततळ्याची निगा व दुरुस्तीची जबाबदारी देखील शेतकऱ्यांची राहील.
4) पावसाळ्यामध्ये तळ्यात गाळ वाहून येणार नाही येत व साचणार नाही याची व्यवस्था लाभार्थ्यांनी करावी.
5) मंजूर आकारमानाचे शेततळे फोन नाही हे शेतकऱ्यासाठी बंधनकारक राहील.
6) शेततळ्यासाठी प्लास्टिक अस्तरीकरण स्वखर्चाने करावे लागेल.
- अर्ज कसा करावा*
✍️ http://egs.mahaonline.gov.in या संकेत स्थळावर जाऊन अर्ज भरण्यासाठी क्लिक करा.
✍️ अर्ज भरण्यासाठी प्रोफाईल वरून लॉगिन करा व्यक्तिगत किंवा सामूहिक शेततळे हा पर्याय निवडा त्यानंतर अर्ज दाखल करून एप्लीकेशन नंबर लिहून ठेवा.
✍️ उल्लेख केलेल्या कागदपत्रांचा पीडीएफ मध्ये अपलोड करून सबमिट करा.
✍️ डाऊनलोड केलेल्या फॉर्मवर सही करण्यासाठी जिथे जागा असेल तिथे सही करा.
✍️ तसेच दारिद्र रेषेखालील चा दाखला (असेल तर), आत्महत्याग्रस्त कुटुंबाचा वारस दाखला (असेल तर) सातबारा उतारा चा उतारा इत्यादी कागदपत्रे स्कॅन करून ठेवा.
मी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी आहे शेततळे अनुदान केंव्हा सुरु होणार आहे