ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

शेवंती लागवडीची संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर..

Complete information of Shevanti cultivation with just one click.

नैसर्गिक देणगीमुळे शेवंतीला ‘फुलांची राणी’ समजले जाते. भारतामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी या पिकाची लागवड केली जाते. महाराष्ट्रात (Maharashtra) शेवंतीच्या लागवडीत अहमदनगर (Ahmednagar) जिल्हा अग्रेसर असून पुणे, नाशिक, सोलापूर, सांगली, सातारा व नागपूर या जिल्ह्यांतही तिची लागवड लहानमोठ्या प्रमाणात केली जाते.

उपयोग: (Use)
शेवंतीच्या फुलांचा उपयोग हार, गुच्छ, वेण्या बनविण्यासाठी तसेच फुलदाणीत ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. महाराष्ट्रात विशेषत: दसरा, दिवाळी, नाताळ आणि लग्नसराईमध्ये या फुलांना मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांतून प्रचंड प्रमाणावर मागणी असते.

लागवडीचा हंगाम: (Planting season:)
शेवंतीच्या फुलांची लागवड, ज्या वेळेस कमी तापमान कमी असेल अशी वेळ असावी पाण्याच्या उपलब्धतेनुसार शेवंतीची लागवड लवकर /उशिरा केली जाते ,जून ते ऑगस्ट या महिन्यात शेवंतीची लागवड करता येते या कालावधीत लावलेली फुले डिसेंबर महिन्यामध्ये उत्पनदन देतात.

लागवड: (Planting)
लागवडीसाठी प्रथमतः जमीन उभी-आडवी नांगरून, कुळवून भुसभुशीत करावी. जमीन तयार करताना हेक्‍टरी २५ ते ३० टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. जमिनीच्या उताराला आडव्या ६० सेंमी अंतरावर सऱ्या सोडून वाफे तयार करावेत. लागवडीसाठी मागील हंगामातील शेवंती पिकाच्या निरोगी काश्‍या वापराव्यात. लागवड ही सरीच्या दोन्ही बाजूस ३० सेंमी अंतरावर बगलेत करावी.

सुधारित जाती: (Improved breeds)
महाराष्ट्रात सोनाली तारा, बग्गी, झिप्री, राजा, पांढरी व पिवळी रेवडी, शरदमाला, बंगळूर, रतलाम चंद्रमा आदी जाती लागवडीखाली आहेत. शेवंतीच्या वाढीसाठी 20 ते 30 अंश तापमान तर फुलण्यासाठी 10 ते 17 अंश सेल्सिअस तापमानाची आवश्‍यकता असते.

खत व्यवस्थापन: (Fertilizer management)
शेवंती च्या उत्तम वाढीसाठी आणि दर्जेदार उत्पन्न साठी लागवडीपूर्वी जमीन तयार करताना हेक्‍टरी 25 ते 30 टन शेणखत जमिनीत मिसळावे. लागवडीच्या वेळी हेक्‍टरी 150:200:200 किलो नत्र स्फुरद व पालाश लागवडीनंतर दीड महिन्याने दीडशे किलो नत्र हेक्‍टरी या प्रमाणात द्यावे.

पाणी व्यवस्थापन: (Water management) शेवंतीच्या फुलांना, जास्त पाणी देण्याची गरज नसते, या फुलांना जास्त पाणी दिल्यास खोडाच्या तळाशी सरीत साठून राहिल्यास मुळकुज हा रोग होतो म्हणून पावसाळ्यात पाण्याचा योग्य निचरा होईल याची व्यवस्था करावी. अंदाज घेऊन 10-12 दिवसाने पाणी देणे गरजेचे आहे.तसेच पाण्याचा अधिक ताण पडणार नाही याची दक्षता घ्यावी.

वेळोवेळी निंदणी करून पीक तणमुक्त ठेवावे, त्यामुळे जमीन भुसभुशीत राहून पिकाची जोमदार वाढ होते.चौथ्या आठवड्यानंतर करावे शेंडा खुडल्याने अधिक फुटवे फुटून फुलांच्या उत्पादनात वाढ होते.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

1. पिकांवरील लष्करी आळीमुळे हैराण झाला आहात का तर करा ‘ह्या’ उपाययोजना..

2. इंधन दरवाढीबाबत, “नितीन गडकरी” यांचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांना “या” निर्णयाचा किती फायदा होणार जाणून घ्या ; सविस्तर बातमी….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button