ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Compensation For Damages | नुकसानीच्या ढगांना शासनाचा बांध! १३,६०० ते ३६,००० रुपये मदत, अवकाळी-गारपीट पीडित शेतकऱ्यांना नवचैतन्य!

Compensation For Damages | The government's dam to the clouds of damage! 13,600 to 36,000 rupees help, new consciousness to farmers suffering from unseasonal hail!

Compensation For Damages | गेल्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात अवकाळी आणि गारपीटीच्या संकटाने महाराष्ट्राला चपेटात घेतले होते. यामुळे राज्यातील सुमारे १२.८७ लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून २३.९० लाख शेतकरी बांधवांना मोठा फटका बसला होता. या पीडित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य सरकारने निकषांबाहेर जाऊन मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. (Compensation For Damages) हा निर्णय सोमवारी (ता.१) महसूल आणि वन विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयाद्वारे जाहीर करण्यात आला.

  • निकषांबाहेर जाऊन मदत – या शासन निर्णयानुसार, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जिरायती पिकांसाठी प्रति हेक्टर १३,६०० रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाणार आहे. ही मदत आता तीन हेक्टरपर्यंतच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार आहे, जी पूर्वीच्या दोन हेक्टरच्या मर्यादेपेक्षा जास्त आहे. यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणे अपेक्षित आहे.

वाचा : Crop Loan Recovery | दुष्काळात नवी आशा! पीक कर्ज वसुली स्थगित, शेतकऱ्यांना 31 मार्च 2024 पर्यंत ‘मुबलक’ वेळ

  • विविध पिकांसाठी वेगवेगळी मदत – जिरायती व्यतिरिक्त, बागायती आणि बहुवार्षिक पिकांसाठीही वेगवेगळी मदत देण्याची तरतूद या शासन निर्णयात करण्यात आली आहे. बागायती पिकांसाठी प्रति हेक्टर २७,००० रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी प्रति हेक्टर ३६,००० रुपये इतकी मदत दिली जाणार आहे.
  • प्रक्रिया कशी? – या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे करून संबंधित पंचायत समितीकडे सादर करावे लागतील. त्यानंतर पंचायत समिती नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी प्रस्ताव तयार करेल आणि पुढील कार्यवाही महसूल विभागाकडून राबवली जाईल.
  • शेतकऱ्यांना दिलासा – राज्य सरकारच्या या निर्णयामुळे अवकाळी आणि गारपीट हल्ल्यामुळे नुकसान सोसणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ही मदत त्यांच्या पुनर्वसनासाठी आणि पुढील शेतीच्या हंगामासाठी उपयोगी ठरेल, अशी अपेक्षा आहे.

Web Title | Compensation For Damages | The government’s dam to the clouds of damage! 13,600 to 36,000 rupees help, new consciousness to farmers suffering from unseasonal hail!

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button