कृषी सल्ला

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक; आता जमीन मोजून होणार कमी खर्चात, किती शुल्क आकारला जाणार? पहा सविस्तर..

शेतकऱ्यांना (farmers) कित्येकदा सातबाऱ्यावर असलेली शेतजमीन प्रत्यक्षात दिसत का नाही. या समस्यांमध्ये शेतकरी अडकला असेल तर त्याची ही शंका दूर करण्यासाठी शेतजमिनीची शासकीय पद्धतीनं मोजणी करणे हा पर्याय उपलब्ध असतो. शेतजमिनीची मोजणी (Counting of agricultural land) करण्यासाठी अर्ज कसा करायचा? त्यासाठी लागणारी कागदपत्रे तसेच, मोजणीसाठी किती शुल्क आकारला जातो? व सरकारची ई-मोजणी प्रणाली. या विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.

वाचा –

😍 शेतकऱ्यांना दिलासा; “या” योजनेसाठी निधी वितरीत, मिळणार एवढ्या रकमेचा लाभ; पहा सविस्तर माहिती..

मोजणीसाठीचा अर्ज आणि कागदपत्रे

शेतकरी तशी कोणती समस्या वाटल्यास उप-अधीक्षक भूमी अभिलेख किंवा नगर भूमापन अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज करू शकतात.

या अर्जाचा नमुना सरकारच्या bhumiabhilekh.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

असा अर्ज करा –

1) मोजणीसाठी अर्ज घेऊन तुम्ही ज्या तालुक्यातील कार्यालयात अर्ज सादर करत आहात, त्या तालुक्याचं आणि जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे.

2) त्यानंतर पहिल्या पर्यायापुढे “अर्जदाराचे संपूर्ण नाव आणि पत्ता” याविषयी माहिती द्यायची आहे. यात अर्जदाराचं नाव, गावाचं नाव, तालुका आणि जिल्ह्याचं नाव लिहायचं आहे.

3) त्यानंतर “मोजणी करण्यासंबंधीची माहिती व मोजणी प्रकाराचा तपशील” हा दुसरा पर्याय आहे. यातील मोजणीच्या प्रकारासमोर “मोजणीचा कालावधी” आणि “उद्देश” लिहायचा आहे.

4) त्यापुढे तालुक्याचं नाव, गावाचं नाव आणि शेतजमीन ज्या गट क्रमांकांत येते, तो गट क्रमांक टाकायचा आहे. तिसरा पर्याय आहे “सरकारी खजिन्यात भरलेली मोजणी फीची रक्कम.” यासमोर मोजणी फीची रक्कम लिहायची आहे आणि त्यासाठीचा चलन किंवा पावती क्रमांक आणि दिनांक लिहायचा आहे.

5) पुढे मोजणीसाठी जी फी (शुल्क) आकारली जाते, तिची रक्कम किती क्षेत्रावर मोजणी करायची आहे आणि ती किती कालावधीत करून घ्यायची आहे, यावरून ठरत असते.

वाचा –

जमीन मोजणीचे तीन प्रकार पडतात.

साधी मोजणी जी 6 महिन्यांच्या कालावधीत केली जाते, तातडीची मोजणी 3 महिन्यांमध्ये, तर अतितातडीची मोजणी 2 महिन्यांच्या आत केली जाते. एक हेक्टर क्षेत्रावर साधी मोजणी करायची असल्यास 1 हजार रुपये, तातडीच्या मोजणीसाठी 2 हजार रुपये, तर अतितातडीच्या मोजणीसाठी 3 हजार रुपये शुल्क आकारलं जातं.

हे ही वाचा –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button