शेतकऱ्यांसाठी दिलासादायक; PM किसान योजनेच्या 10 व्या हप्त्याची तारीख जारी, “या” तारखेला पैसे खात्यात जमा होणार..
Comfortable for farmers; Date of 10th installment of PM Kisan Yojana issued, money will be credited to the account on this date.
शेतकर्यांसाठी आता मोठी बातमी आहे. जर तुम्ही पीएम किसान (PM Kisan Samman Nidhi Yojana) योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला लवकरच चांगली बातमी मिळू शकते. सरकार पीएम किसान योजनेअंतर्गत (PM Kisan 10th installment) 10 वा हप्ता जारी करणार आहे. तारीख निश्चित केली असून, हप्ता हस्तांतरित करण्यासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे.
वाचा –
आतापर्यंत केंद्राने भारतातील 11.37 कोटी शेतकऱ्यांना 1.58 लाख कोटी रुपये हस्तांतरित केलेत. केंद्र सरकार 15 डिसेंबर 2021 पर्यंत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 10 वा हप्ता जारी करण्याचा विचार करत आहे. सरकारने गेल्या वर्षी 25 डिसेंबर 2020 रोजी शेतकऱ्यांना पैसे हस्तांतरित केले होते.
30 सप्टेंबरपूर्वी नोंदणी करा –
जर तुम्हाला पीएम किसानचा (PM kisan) शेवटचा हप्ता मिळाला नसेल, तर पुढील हप्त्यासह मागील रक्कम मिळेल. म्हणजेच शेतकऱ्यांना 4000 रुपये थेट त्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर आहे. तुम्हाला फक्त पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल आणि अर्ज करावा लागेल. तुमचा अर्ज स्वीकारला गेल्यास तुम्हाला ऑक्टोबरमध्ये 2000 रुपयांचा दुसरा हप्ता मिळेल. 2000 डिसेंबरमध्ये उपलब्ध होतील.
सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये देते
पंतप्रधान किसान योजनेंतर्गत देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये मिळतात. शासन ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर ऑनलाईन वर्ग करते. तुम्हीही शेतकरी असाल पण या योजनेचा लाभ घेऊ शकत नसाल तर काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही PM किसान सन्मान निधी मध्ये तुमचे नाव देखील नोंदवू शकता, जेणेकरून तुम्हाला सरकारच्या योजनेचा लाभ घेता येईल.
वाचा –
नोंदणी अशी करा –
1) तुम्हाला सर्वप्रथम पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
2) आता फार्मर्स कॉर्नरवर जा.
3) येथे तुम्हाला ‘New Farmer Registration’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
4) यानंतर तुम्हाला आधार क्रमांक टाकावा लागेल.
यासोबतच कॅप्चा कोड टाकून राज्याची निवड करावी लागेल आणि त्यानंतर ही प्रक्रिया पुढे करावी लागेल.
5) या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण वैयक्तिक माहिती भरावी लागेल.
6) यासोबतच बँक खात्याचा तपशील आणि शेतीशी संबंधित माहिती भरावी लागणार आहे.
7) त्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता.
याचा फायदा कोण घेऊ शकतो?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी 18 ते 40 वयोगटातील कोणताही शेतकरी लाभ घेऊ शकतो. या अंतर्गत शेतकऱ्याकडे जास्तीत जास्त 2 हेक्टर लागवडीयोग्य जमीन असावी. योजनेंतर्गत किमान 20 वर्षे आणि कमाल 40 वर्षांसाठी 55 ते 200 रुपयांपर्यंत मासिक पैसे द्यावे लागतील. शेतकऱ्याच्या वयानुसार ते ठरवले जाते.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा –