CM Vayoshree Yojana | ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी! मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत 3 हजार रुपये आर्थिक मदत, लगेच करा अर्ज

CM Vayoshree Yojana
CM Vayoshree Yojana | मुख्यमंत्री वयोश्री योजना नावाची नवीन योजना (CM Vayoshree Yojana) सुरू करण्यात आली आहे ज्याअंतर्गत 65 वर्षे आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना 3 हजार रुपये आर्थिक (Financial) मदत दिली जाणार आहे.
योजनेचा उद्देश:
ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक आधार देणे
दिव्यांगत्व आणि अशक्तपणावर उपाययोजना
आवश्यक साह्य साधने आणि उपकरणे खरेदी करण्यासाठी मदत
मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी मदत
पात्रता:
वय 65 वर्षे किंवा त्यावरील (31 डिसेंबर 2023 पर्यंत)
वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपये पर्यंत
आधार कार्ड आवश्यक
जिल्ह्यातील महिला लाभार्थ्यांची संख्या 30%
लाभ:
3 हजार रुपये आर्थिक मदत
चष्मा, श्रवणयंत्र, व्हीलचेअर, वॉकर इत्यादी उपकरणे खरेदी करण्यासाठी मदत
मन:स्वास्थ्य केंद्र आणि योगोपचार केंद्राद्वारे मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी मदत
आवश्यक कागदपत्रे:
आधार कार्ड / मतदान ओळखपत्र
राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबूकची झेरॉक्स
पासपोर्ट आकाराचे 2 फोटो
स्वयं-घोषणापत्र
इतर कागदपत्रे (गरजेनुसार)
अर्ज कसा करावा?
अर्ज करण्यासाठी समाज कल्याण विभाग कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, येरवडा येथे संपर्क साधा.
दूरध्वनी क्रमांक: 020-29706611