ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
आरोग्य

CM Medical Assistance Fund | आजच अर्ज करा आणि तुमच्या गंभीर आजारावर मोफत उपचार ! जाणून घ्या कसा करायच अर्ज ?

CM Medical Assistance Fund | Apply today and get free treatment for your critical illness! Know how to apply?

CM Medical Assistance Fund | राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी (CM Medical Assistance Fund) हा एक मोठा आधार आहे. या निधीतून विविध गंभीर आजारांच्या उपचारांसाठी आर्थिक मदत दिली जाते.

अर्ज कसा करावा?

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीसाठी अर्ज करण्यासाठी ८६५०५६७५६७ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून किंवा ऑनलाइन www.cmrf.maharashtra.gov.in या वेबसाइटवरून अर्ज करता येतो. अर्ज केल्यानंतर काही दिवसांतच मुख्यमंत्री वैद्यकीय समितीच्या शिफारशीनुसार संबंधित रुग्णाला अर्थसाहाय्य केले जाते.

कोणत्या आजारांसाठी मदत मिळते?

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून कॉकलियर इम्प्लांट (२ ते ६ वर्षे वयोगट), हृदय प्रत्यारोपण, यकृत प्रत्यारोपण, किडनी प्रत्यारोपण, फुफ्फुस प्रत्यारोपण, बोनमॅरो प्रत्यारोपण, हाताचे प्रत्यारोपण, हिप रिप्लेसमेंट, कर्करोग शस्त्रक्रिया, अपघात शस्त्रक्रिया, लहान बालकांच्या शस्त्रक्रिया, मेंदूचे आजार, हृदयरोग, डायलिसिस, कर्करोग केमोथेरपी किंवा रेडिएशन, अपघात, नवजात शिशुंचे आजार, गुडघ्याचे प्रत्यारोपण, बर्न रुग्ण (भाजलेला रुग्ण), विद्युत अपघात रुग्ण अशा २० गंभीर आजारांच्या रुग्णांसाठी मदत मिळते.

वाचा : Weather Forecast | आता आणखी भरणार थंडीमुळे हुडहुडी! पण पाऊसही असेल काय? शेतकऱ्यांनो जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

अर्जासोबत लागणारी कागदपत्रे

  • वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र (खासगी रुग्णालय किंवा सिव्हिल हॉस्पिटलकडून प्रमाणित केलेले)
  • तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक १.६० लाखांपेक्षा कमी उत्पन्न अपेक्षित)
  • रुग्णाचे आधारकार्ड, लहान बाळासाठी आईचे आधारकार्ड
  • रुग्णाचे रेशनकार्ड, आजाराचे रिपोर्ट
  • प्रत्यारोपण रुग्णासाठी शासकीय समितीची मान्यता असलेले प्रमाणपत्र

अर्थसाहाय्याची रक्कम

मुख्यमंत्री वैद्यकीय समितीच्या शिफारशीनुसार २५ हजार ते दोन लाखांपर्यंत रुग्णांना उपचारासाठी मदत केली जाते.

अधिक माहितीसाठी

www.cmrf.maharashtra.gov.in या वेबसाइटला भेट द्या किंवा ८६५०५६७५६७ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी हा गरजू रुग्णांसाठी एक मोठा आधार आहे. या निधीमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना गंभीर आजारांवर उपचार घेणे शक्य होत आहे.

हेही वाचा :

Web Title : CM Medical Assistance Fund | Apply today and get free treatment for your critical illness! Know how to apply?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button