कृषी सल्ला

‘या’ पिकांच्या उत्पादकतेवर होणार हवामान बदलाचा अनिष्ट परिणाम! जाणून घ्या या संकटाशी कसा कराल सामना…

Climate change will adversely affect the productivity of these crops! Learn how to deal with this crisis

पीक उत्पादकतेवर हवामान बदलाचा मोठा परिणाम घडत असतो, अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात जागतिक हवामान सातत्याने बदल होत आहेत. महाराष्ट्राचा विचार केला असता, पन्नास टक्क्यांहून अधिक लोक शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. मानवी हस्तक्षेपामुळे मिथेन, कार्बनडाय ऑक्साईड, नायट्रीक ऑक्साईड (Methane, carbon dioxide, nitric oxide) या वायूमुळे सातत्याने हवामानात बदल होत आहे. सर्वांचा परिणाम पिकांच्या उत्पादकतेवर होत आहे.

अनियमित पाऊस व तापमानामध्ये होणारी वाढ (Irregular rainfall and increase in temperature) याचा अनिष्ट परिणाम यापूर्वीच आपण शेतीवर पहिला आहे, परंतु येत्या काही काळामध्ये याचा अनिष्ट परिणाम अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. लोकसंख्येचे वाढते प्रमाण, पाणी व्यवस्थापनाचे बिघडते तंत्र, मातीचे आरोग्य, हे घटक देखील पीक व्यवस्थापनात अडचणी निर्माण करू शकतात.

पावसाळ्यामध्ये जनावरांची अशी घ्या काळजी…!

इन्स्टिट्यूट फॉर सस्टेनेबल कम्युनिटीज या अहवालाने (According to a report by the Institute for Sustainable Communities) नुकतेच हवामान बदलाचा महाराष्ट्रातील पिकांवर काय परिणाम होवू शकतात हे सांगण्यात आले आहेत. या संस्थेने विदर्भ, खान्देश, मराठवाडा, या विभागातील आठ जिल्ह्यांचा अभ्यास करून पर्जन्यमानाचा अंदाज (Rainfall forecast) लावला आहे.

पावसाची अनियमितता, अधून-मधून घडणाऱ्या सुकाळ दुष्काळ पाऊस यामुळे कापूस व सोयाबीन (Cotton and soybeans) पिकांना मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. खरीप हंगामाच्या (Kharif season) मधोमध पडणाऱ्या पावसामुळे पिकांवर बुरशीजन्य रोग, किडींचा प्रादुर्भाव, तण वाढण्याची शक्यता आहे.

श्रीगोंदे येथे बहरले स्ट्रॉबेरी आणि सफरचंद! तरुणाच्या कामगिरीवर कौतुकाचा वर्षाव…

तसेच उच्च हवामानामुळे गहू, हरभरा, (Wheat, gram,) यांवर परिणाम होऊन दाण्याची वजन कमी भरते परिणामी उत्पादकतेवर त्याचा परिणाम होतो. हरभरा पिकाचे घाटे भारताना तापमानामध्ये वाढ होते, परिणामी अपेक्षित उत्पदन मिळत नाही.

उत्पादन वाढविण्याकरिता कराव्या ह्या उपाय योजना…
(Measures to be taken to increase production)

  • शेतीवर उत्तम प्रकारे संशोधन करून हवामानातील तापमान, आद्रता, पाऊस याचा अचूक अंदाज लावणे गरजेचे आहे.
  • वरील सर्व घटकांचा अभ्यास करून पिकांच्या जाती, लागवडीची तारीख, मातीचे प्रकार, खतांचा प्रकार, सिंचनाबाबतची तपशील माहिती अश्या घटकांकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.
  • शेतकऱ्यांना पिकाच्या संभाव्य जोखमी बद्दल मार्गदर्शन करणे आवश्यक आहे व त्यासाठी शिबिर (Camp) आयोजीत करून मार्गदर्शन करने आवश्यक आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

1. ऑनलाइन पद्धतीने सातबाऱ्यावरील चुका कशा दुरुस्त कराल?

2. पशुखाद्य’ दर कडाडले शेतकऱ्यांचे आर्थिक गणित मात्र कोलमडले! वाचा सविस्तरपणे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button