ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

महाराष्ट्रात हवामानाचा बदलाचा पारा चढला: जोरदार पावसाची शक्यता, इतर जिल्ह्यांची स्थिती काय?

कोकणात रविवारी (ता. ५) सांताक्रूझ आणि डहाणू येथे उच्चांकी ३६.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तर महाबळेश्वर वगळता उर्वरित राज्यात कमाल तापमान ३१ ते ३५ अंशाच्या दरम्यान होते.

राज्यातील किमान तापमानातही वाढ झाली आहे. रविवारी (ता. ५) निफाड येथे राज्यातील नीचांकी १४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.

पावसाला पोषक हवामान झाल्याने राज्यात आकाश ढगाळ झाले आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत जोरदार वारे, विजांसह पावसाची शक्यता आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचे संकेत

दक्षिण तमिळनाडू आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. या ही प्रणाली वायव्येकडे सरकत जाणार असून, या वाऱ्यांच्या प्रभावामुळे पूर्व-मध्य अरबी समुद्रात बुधवारपर्यंत (ता. ८) कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. उत्तर अंतर्गत कर्नाटकपासून वरील चक्राकार वाऱ्यांपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निवळून गेला आहे.

 • महाराष्ट्रात सोमवारी (ता. ६) काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
 • सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत जोरदार वारे, विजांसह पावसाचा इशारा कायम आहे.
 • अरबी समुद्रात कमी दाबाचे संकेत आहेत.

वाचा: Music Therapy | पशू तज्ञांचा मोठा दावा! बासरीचे सूर ऐकून गायी-म्हशी देतात जास्त दूध; जाणून घ्या काय आहे संगीत थेरपी?

हवामान अंदाज

सोमवार, ता. ६

 • कोकण : बहुतांश ठिकाणी ढगाळ, काही ठिकाणी जोरदार वारे, विजांसह पाऊस
 • मध्य महाराष्ट्र : बहुतांश ठिकाणी ढगाळ, काही ठिकाणी हलका पाऊस
 • मराठवाडा : बहुतांश ठिकाणी ढगाळ, काही ठिकाणी हलका पाऊस
 • विदर्भ : बहुतांश ठिकाणी ढगाळ, काही ठिकाणी हलका पाऊस

मंगळवार, ता. ७

 • कोकण : बहुतांश ठिकाणी ढगाळ, काही ठिकाणी हलका पाऊस
 • मध्य महाराष्ट्र : बहुतांश ठिकाणी ढगाळ, काही ठिकाणी हलका पाऊस
 • मराठवाडा : बहुतांश ठिकाणी ढगाळ, काही ठिकाणी हलका पाऊस
 • विदर्भ : बहुतांश ठिकाणी ढगाळ, काही ठिकाणी हलका पाऊस

बुधवार, ता. ८

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button