
Agricultural Advice | शेतकरी मित्रांनो पुढच्या चार दिवसांसाठी हवामान (Weather) आधारित पीक निहाय कृषी सल्ला (Department of Agriculture) काळजीपूर्वक वाचून पिकाची काळजी घ्यावी.
कृषी सल्ला
• परिपक्व अवस्थेतील धान पिकाची कापणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
• कपाशीमधील (Cotton Rate) दहिया रोग व पानावरील ठिपके रोगाच्या व्यवस्थापनासाठी अझॉक्सिस्ट्रो बिन 18.2 % डब्ल्यू/डब्ल्यू + डायफेनोकोनाझोल
11.4 % डब्ल्यू/डब्ल्यू एससी 10 मिली किंवा क्रेसॉक्सिम-मिथाइल 44.3 एसस 10 मिली प्रती 10 लिटर पाण्यात
मिसळून फवारणी करावी.
• ज्या भागात कापूस पिक (Cotton crop) पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे.
• तेथे शेतकरी (Type of Agriculture) बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे.
• वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या
आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा.
• कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान
टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा.
तूर
तूर पिकाला कळ्या आणि फुले लागताच कीड व्यवस्थापनासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून 5 टक्के निंबोळी अर्क अॅकझाडीराक्टिन 300 पीपीएम 50 मिली अधिक 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी
करावी. पाने खाणाऱ्या अळीच्या निरीक्षणासाठी हेक्टरी ५ फेरोमेन सापळे 50 मी. अंतरावर लावावे. तूर पिकामध्ये शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत
असल्यास क्लोराँट्रा निलिप्रोल 18.50 % एससी 150 मिली प्रती 500 ते 750 लिटर पाणी प्रती हेक्टर फवारणी करावी.
वाचा: पांढऱ्या सोन्याला येणार अजून झळाळी! बाजारात ओस पडल्याने व्यापारी शेतकऱ्यांच्या दारात
सूर्यफूल
सूर्यफूल पिकामध्ये उगवणीनंतर 10 ते 15 दिवसांनी विरळणी करावी आणि एका ठिकाणी एकच जोमदार
रोपटे ठेवावे.
कापूस
ज्या भागात कापूस पिक पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे. तेथे शेतकरी
बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि
सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान
टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीमधील दहिया रोग व्यवस्थापनासाठी अझॉक्सिस्ट्रो बिन 18.2 % डब्ल्यू/डब्ल्यू +
डायफेनोकोनाझोल 11.4 % डब्ल्यू/डब्ल्यू एससी 10 मिली किंवा क्रेसॉक्सिम-मिथाइल 44.3 एसस 10 मिली
प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
वांगे
वांग्याच्या पिकावर फळे व शेंडा पोखरणाऱ्या अळीचा रादुर्भाव दिसून आल्यास व आर्थिक नुकसान
पातळी गाठत असल्यास कार्बोसल्फान 25 % ईसी 1250 मिली प्रति हेक्टर किंवाडेल्टामेथ्रिन 02.80% ईसी 400 ते 500 मिली प्रति हेक्टर किंवाइमामेक्टिन बेंझोएट 05% एसजी 200 ग्रॅम प्रति हेक्टर
किंवालॅम्बडा-सायहॅलोथ्रीन 04.90 % सीएस 300 मिली प्रति हेक्टर किंवास्पिनोसॅड 45% एससी 162
ते 187 मिली प्रति हेक्टर किंवाथियाक्लोप्रिड 21.70 % एससी 750 मिली प्रति हेक्टर
किंवाक्लोराँट्रा निलिप्रोल 09.30% + लॅम्बडा-सायहॅलोथ्रीन 04.60 % झेडसी 200 मिली प्रति हेक्टर या
प्रमाणात 500 लिटर पाण्यात मिसळून कोणत्याही एका कीटकनाशकाची फवारणी करावी.
वाचा: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर; तीन दिवसांत होणार खात्यावर जमा
मिरची
तापमानातील चढ उतार व उच्च आद्रतेमुळे मिरची पिकावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास
व्यवस्थापनासाठी हेक्साकोनाझोल 75 % डब्ल्यूजी 66.7 ग्राम ग्रॅम किंवा टेब्युकोनाझोल 25%
डब्ल्यूजी @ 500-750 ग्रॅम किंवा अझॉक्सीस्ट्रो बिन 8.3 % + मॅन्कोझेब 66.7 % डब्ल्यूजी @ 1500
ग्रॅम येवढ्या प्रमाणात प्रति हेक्टर 500 लिटर पाण्यात फवारणी करावी.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा:
- 13व्या हप्त्यापूर्वी मोदींच शेतकऱ्यांना गिफ्ट! खात्यात येणार पूर्ण 15 लाख रुपये, त्वरीत ‘असा’ करा अर्ज
- बिग ब्रेकिंग! कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत ‘इतक्या’ कोटींच्या निधीस मान्यता; निम्याचं किमतीत मिळणारं ट्रॅक्टर
Web Title: Farmers, how will the weather be for the next four days; Know Climate Based Crop Wise Agriculture Advice