रब्बी आणि काढणीला आलेल्या पिकांची कशी घ्याल काळजी, - मी E-शेतकरी
कृषी सल्ला

Agroment Advisory | रब्बी आणि काढणीला आलेल्या पिकांची कशी घ्याल काळजी, वाचा हवामान आधारित कृषी सल्ला

Agroment Advisory | शेतकरी मित्रांनो आकाश निरभ्र ते आंशिक ढगाळ व हवामान (Weather) कोरडे
राहण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे पुढचे चार दिवस तुमच्या शेती (Agriculture) पिकाची कशी काळजी घ्यावी हे जाणून घेऊयात.

वाचा: तूर उत्पादकांची चांदी! आयात वाढूनही यंदा बाजारात तूर राहणार तेजीत, जाणून घ्या कसा मिळेल भाव?

कृषी सल्ला
• परिपक्व अवस्थेतील धान पिकाची कापणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
• कपाशीमधील (Cotton Rate) पानांवरील
तपकिरी ठिपके किंवा दहिया रोग व पानावरील बुरशीजन्य ठिपके रोगाच्या व्यवस्थापनासाठी (Crop Management) अझॉक्सिस्ट्रो बिन
18.2 % डब्ल्यू/डब्ल्यू + डायफेनोकोनाझोल 11.4 % डब्ल्यू/डब्ल्यू एससी 10 मिली किंवा क्रेसॉक्सिम-मिथाइल 44.3
एसस 10 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
• तसेच सडलेली बोंडे व रोगग्रस्त पिकांचे अवशेष
गोळा करून शेताबाहेर नष्ट करावीत.
• ज्या भागात कापूस पिक (Cotton crop) पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या
अवस्थेत आहे, तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे.
• वाणानुसार वेचणी केलेला कापूस
कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा.
• कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे
नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा.

मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या पाणीपुरवठ्यासाठी तब्बल ‘इतक्या’ कोटींचा निधी मंजूर

Gram | हरभरा वाफसा अवस्थेत हरभरा पिक 20 ते 30 दिवसाच्या अवस्थेत असताना पाणी व अन्नद्रव्यासाठी पिकाची
तनासोबत स्पर्धा टाळण्यासाठी दोनवेळा खुरपणी व कोळपणी करावी.

Sunflower | सूर्यफूल
सूर्यफूल पिकामध्ये उगवणीनंतर 10 ते 15 दिवसांनी विरळणी करावी आणि एका ठिकाणी एकाच जोमदार रोपटे
ठेवावे.

वाचा: ब्रेकिंग न्यूज! केंद्र सरकार शेतकऱ्यांना देणार 10 हजार रुपये; त्वरित जाणून घ्या तुम्हाला मिळणार का?

Wheat | गहू
• गहू पिकास पेरणीनंतर 18 ते 20 दिवसानंतर मुकुट मुळे फुटण्याच्या अवस्थेत पहिले पाणी द्यावे.
• या
अवस्थेत पाण्याचा ताण बसल्यास ३३ टक्के पर्यंत उत्पादनात घट येऊ शकते.
• बागायती उशिरा गहू
पेरणीसाठी प्रती हेक्टरी 150 किलो बियाणे पेरणीसाठी वापरावे.
• गहू पिकाच्या एचडी 2189 किंवा पूर्णा यासारख्या जाड दाण्यांच्या वाणांसाठी बियाणे दर प्रती हेक्टरी 125 किलो वापरावे.
• बागायती उशिरा पेरणीसाठी 80 किलो नत्र, 40 किलो स्फुरद व 40 किलो पालाश या प्रमाणात रासायनिक खतांची मात्रा द्यावी.
• बागायती वेळेवर आणि उशिरा या दोन्ही पेरणीसाठी नत्राची अर्धी मात्रा तसेच संपूर्ण स्फुरद आणि पालाश पेरणीवेळी द्यावे.
• उरलेली नत्राची अर्धी मात्रा पहिल्या पाण्याचे पाळीच्या वेळी (18 ते 20
दिवसानंतर) द्यावी.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: How to care for rabi and harvest crops, read climate based agriculture advice

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button