Agromet Advisory | भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार, आजपासून पुढील चार दिवस दिनांक 10 ते 13 डिसेंबर 2022 दरम्यान आकाश आंशिक ते अंशतः ढगाळ राहण्याची (Weather Update) अधिक
शक्यता आहे. दिनांक 10, 11 व 12 डिसेंबर 2022 रोजी तुरळक ठिकाणी अति हलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस
होण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे. म्हणून शेतकऱ्यांनी (Department of Agriculture) आपल्या पिकाची कशाप्रकारे काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.
कृषी सल्ला
• पावसाचा अंदाज लक्षात घेता कापूस पिक पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे. तेथे
शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे.
• वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि
सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा.
• कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी
प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा.
• परिपक्व अवस्थेतील धान पिकाची काढणी
तात्काळ करावी.
• धान पिकाची कापणी झाली असल्यास व शेतमाल उघड्यावर ठेवला असल्यास प्लास्टिक शीटच्या सहाय्याने झाकून ठेवावा.
• धान कापणी झाली असल्यास व शेतमाल शेतात पसरून ठेवला असल्यास एकत्र गोळा
करून प्लास्टिक शीटच्या सहाय्याने झाकून ठेवाव.
कपाशी
ज्या भागात कापूस पिक पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी
बांधवांनी
कपाशीच्या
वेचनीच्या
कामाला प्राधान्य
द्यावे. वाणानुसार
वेचणी
केलेला
कापूस कोरड्या
आणि सुरक्षित
ठिकाणी
साठवणूक
करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व
पुढील संक्रमणाचे
नुकसान
टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा.
तूर
तूर पिकाला कळ्या आणि फुले लागताच कीड व्यवस्थापनासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून 5 टक्के
निंबोळी अर्क अॅआझाडीराक्टिन 300 पीपीएम 50 मिली अधिक 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पाने खाणाऱ्या अळीच्या निरीक्षणासाठी हेक्टरी 5 फेरोमेन सापळे 50 मी. अंतरावर लावावे.
गहू
गहू पिकास पेरणीनंतर 18 ते 20 दिवसानंतर मुकुट मुळे फुटण्याच्या अवस्थेत पहिले पाणी द्यावे. या
अवस्थेत पाण्याचा ताण बसल्यास 33 टक्केपर्यंत उत्पादनात घट येऊ शकते. बागायती उशिरा गहू पेरणीसाठी प्रती हेक्टरी 150 किलो बियाणे पेरणीसाठी वापरावे. गहू पिकाच्या एचडी 2189 किंवा पूर्णा
यासारख्या जाड दाण्यांच्या वाणांसाठी बियाणे दर प्रती हेक्टरी 125 किलो वापरावे. बागायती उशिरा
पेरणीसाठी 80 किलो नत्र, 40 किलो स्फुरद व 40 किलो पालाश या प्रमाणात रासायनिक खतांची मात्रा
द्यावी.
बागायती वेळेवर आणि उशिरा या दोन्ही पेरणीसाठी नत्राची अर्धी मात्रा तसेच संपूर्ण स्फुरद आणि पालाश पेरणीच्या वेळी द्यावे व उरलेली नत्राची अर्धी मात्रा पहिल्या पाण्याचे पाळीच्या वेळी (18 ते 20 दिवसानंतर) द्यावी. गहू पिकास मर्यादित सिंचनाची उपलब्धता लक्षात ठेऊन, एकाच ओलिताची व्यवस्था
असल्यास पेरणीनंतर 42 दिवसांनी, दोन ओलिताची व्यवस्था असल्यास 21 व 65 दिवसांनी व तीन
ओलिताची व्यवस्था असल्यास 21, 42 आणि 65 दिवसांनी ओलीत करावे.