कृषी सल्ला

Agricultural Advisory | पुढचे दोन दिवस पिकासाठी धोक्याचे; त्वरित जाणून घ्या हवामान आधारित कृषी सल्ला

Agricultural Advisory | भारतीय हवामान विभाग प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार, 23 नोव्हेंबर 2022 दरम्यान आकाश निरभ्र ते आंशिक ढगाळ व हवामान (Weather Update) कोरडे राहण्याची अधिक शक्यता आहे. कमाल तापमान 30.1 ते 31.1 अंश सेल्सिअस तर किमान तापमान (Temperature) 12.4 ते 13.8 अंश सेल्सिअस राहण्याची आशिक शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आद्रता 56 ते 67 टक्के तर दुपारची सापेक्ष आद्रता 49 ते 57 टक्के राहण्याची (Agri News) अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे.

वाचा: केंद्र सरकारने महिलांसाठी सुरू केली ‘ही’ योजना; व्यवसायासाठी मिळणार तब्बल 25 लाख, त्वरित करा अर्ज

Agricultural Advice | कृषी सल्ला
• परिपक्व अवस्थेतील धान पिकाची कापणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
• कपाशीमधील (Cotton Rate) दहिया
रोग व पानावरील ठिपके रोगाच्या व्यवस्थापनासाठी अझॉक्सिस्ट्रो बिन 18.2 % डब्ल्यू/डब्ल्यू + डायफेनोकोनाझोल
11.4 % डब्ल्यू/डब्ल्यू एससी 10 मिली किंवा क्रेसॉक्सिम-मिथाइल 44.3 एसस 10 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
• वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा.

Sunflower | सूर्यफूल
सूर्यफूल पिकामध्ये उगवणीनंतर 10 ते 15 दिवसांनी विरळणी करावी आणि एका ठिकाणी एकाच जोमदार रोपटे ठेवावे.

वाचा: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! 50 हजारांच्या अनुदानाच्या दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी सुरू, जाणून घ्या कधी मिळणारं?

Cotton | कपाशी
कापसाच्या स्वच्छ वेचणीला प्राधान्य द्यावे. वेचणी केलेला कापूस वाण परत्वे वेगळा ठेवावा. कपाशीमध्ये रस शोषक किडीच्या प्रादुर्भावाकडे लक्ष द्यावे. रस शोषक किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीपेक्षा जास्त दिसून आल्यास, नियंत्रणासाठी फ्लॉनिकॅमिड 50 डब्ल्यूजी 80 ग्रॅम प्रती एकर किंवा
डायनोटेफ्युरोन 20 एसजी 60 ग्रॅम प्रती एकर किंवा थायमेथॉक्झाम 25 डब्ल्यूजी 40 ग्रॅम/ ग्रॅम/एकर ग्रॅम/एकर प्रमाणात किटकनाशकाची स्वच्छ हवामान
(Weather) असताना व वाफसा परिस्थितीत असताना करा व प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास सायपरमेथ्रिन 10 ईसी 10 मिली किंवा फेनव्हॅलेरेट 20 ईसी 10 मिली किंवाडेल्टामेथ्रिन 2.8 ईसी 10 मिली किंवाअल्फा-मेथ्रीन 10 ईसी 10 मिली किंवा बीटा सायफ्लुथ्रीन 2.5 ईसी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गुलाबी बोंड अळी व्यवस्थापनासाठी ट्रा यकोग्रामा अंडी 1.5 लाख प्रती हेक्टर या प्रमाणात वापर करावा.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: The next two days are dangerous for the crop; Get instant weather based agriculture advice

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button