ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

Agricultural Advice | शेतकऱ्यांनो हवामानाचा पारा बिघडला! ‘या’ तारखेपर्यंत वातावरण राहणार ढगाळ; जाणून घ्या हवामान आधारित कृषी सल्ला

Agricultural Advice | Farmers, the mercury in the weather has worsened! Weather will remain cloudy till 'this' date; Learn Climate Based Agriculture Advice

Agricultural Advice | भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवस १४ ते १८ फेब्रुवारी २०२४ दरम्यान आकाश आंशिक ते ढगाळ राहण्याची अधिक शक्यता आहे. दिनांक १४, १५, १६, १७ व १८ फेबुवारी २०२४ रोजी हवामान कोरडे राहण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुढील ५ दिवसादरम्यान, कमाल तापमान ३१, ० ते३१.२ अंश सेल्सिअस दरम्यान तर किमान तापमान १८.३ ते १९.५ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. चला तर मग जाणून घेऊयात हवामान आधारित कृषी सल्ला (Agricultural Advice).

कृषी सल्ला
मागील 2-3 दिवसामध्ये गारपीट व पावसामुळे कापणी केलेला हरभरा, गहू, जवस, तूर इत्यादी पिकाचा शेतमाल पावसाच्या संपर्कात येऊन भिजला असल्यास पुढील ५ दिवस कोरड्या हवामानाचा अंदाज लक्षात घेता उन्हात वळवून मळणी करून घ्यावी. वादळी वारा व गारपिटीमुळे भाजीपाला व फळबागाच्या तुटलेल्या फांद्या या भसीकेटर च्या सहाय्याने काढून टाकून तसेच बुरशी जण्य रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शिफारशीतील बुरशीनाशकाची फवारणी करावी.

वाचा | PM Kisan Yojana | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता ‘या’ महिन्यात होणार जमा; पाहा कधी मिळणारं?

पुढील ५ दिवस कोरड्या हवामानाचा अंदाज लक्षात घेता परिपक्क अवस्थेतील हरभरा, गहू, मोहरी, तूर जवस इत्यादी पिकाची काढणी मळणी ची कामे स्थानिक स्वच्छ व शांत हवामान परिस्थीतिचा अंदाज घेऊन सुरु ठेवावी. पुढील ५ दिवस कोरड्या हवामानाचा अंदाज लक्षात घेताहंगामी पिके, फळबागा, भाजीपाला पिकामध्ये आंतरमशागतीची कामे (डवरणी, खुरपणी इत्यादी.) तसेचकीड व रोग व्यवस्थापनासाठी कृषी रसायनांची फवारणीची कामे, उभ्या पिकामध्ये खाते देण्याची कामे सुरु ठेवावी.

Web Title | Agricultural Advice | Farmers, the mercury in the weather has worsened! Weather will remain cloudy till ‘this’ date; Learn Climate Based Agriculture Advice

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button