ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

Agricultural Advice | पिकासाठी चालू दिवस धोक्याचे? शेतकऱ्यांनो नुकसानीपूर्वीच जाणून घ्या हवामान आधारीत कृषी सल्ला

Current day threat to the crop? Farmers should know weather-based agricultural advice before damage

Agricultural Advice | भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवस महाराष्ट्रात आकाश निरभ्र ते आंशिक ढगाळ आणि हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यातील कृषी क्षेत्राला (Agricultural Advice) धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवसात कमाल तापमान ३२.२ ते ३३.१ अंश सेल्सिअस दरम्यान तर किमान तापमान १६.७ ते १७.३ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६१.० ते ६७.० टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४१.० ते ४७.० टक्के राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. चला तर मग हवामान आधारीत कृषी सल्ला जाणून घेऊयात.

कोरड्या हवामानाचा परिणाम होणार कृषी क्षेत्रावर
पिकांच्या वाढीस अडथळा येऊ शकतो. पिकांना रोग आणि किडींचा प्रादुर्भाव वाढू शकतो. पिकाची उत्पादकता कमी होऊ शकते. पिकांची कापणी आणि मळणी करणे कठीण होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.

वाचा : Kartiki Ekadashi | कार्तिकी एकादशीची पूजा कोणाच्या हस्ते होणार ; जाणून घ्या लगेच सविस्तर

  • कृषी सल्ला
  • आंतरमशागतीची कामे, कृषी रसायनांच्या फवारणी आणि खते कामे पुढील पाच दिवस सुरु ठेवावी.
  • परिपक्व अवस्थेतील सोयाबीन, धान व इतर पिकांची कापणी आणि मळणी तसेच कापूस वेचणीची कामे पुढील पाच दिवस सुरु ठेवावी.
  • पिकाच्या कापणी नंतर शेतमाल जमा करून कोरड्या व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
  • कोरडवाहू गहू पिकाची पेरणी ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात करावी.
  • बागायती जवस पेरणी ७ नोव्हेंबर पर्यंत करावी.
  • रब्बी हंगामातील पेरणी करण्यापूर्वी शिफारशीत असलेल्या सक्रीय घटकाची बीज प्रक्रिया करावी.
  • राज्यातील कृषी क्षेत्राला कोरड्या हवामानाचा धोका निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या अंदाजाचा सखोल विचार करून योग्य नियोजन केले पाहिजे.

वाचा :

Web Title: Current day threat to the crop? Farmers should know weather-based agricultural advice before damage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button