Incentive Grant | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार; त्वरित जाणून घ्या तुम्हाला मिळणार का?
Incentive Grant | Good news for farmers! Farmers will get 50 thousand; Find out instantly Will you get it?
Incentive Grant | कोल्हापूर जिल्ह्यातील १४ हजार ८०० शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान जमा होणार आहे. पालकमंत्री Hasan Mushrif यांनी आज (सोमवार, २६ फेब्रुवारी) याबाबतची माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून तांत्रिक अडचणींमुळे अनुदान वितरण थांबले होते.
अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी शेतकऱ्यांना अनुदान मिळेल याची खात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. त्यानुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सह्यांनी आदेश जारी केले आहेत.
अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी ४० कोटी रुपये कोल्हापूर महापालिकेला वर्ग केले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थमंत्री असताना २०२२ मध्ये ४५ कोटी रुपयांची घोषणा केली होती. यातील ५ कोटी रुपये मंजूर झाले होते, तर ४० कोटी रुपयांचा निधी रखडला होता.
वाचा | PM Kisan | शेतकऱ्यांची दिवाळी! पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे 6 हजार फेब्रुवारीच्या ‘या’ तारखेला होणारं खात्यात जमा
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मागण्या मान्य:
अलीकडेच कोल्हापूर दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकरी अनुदान आणि अंबाबाई मंदिर विकास आराखड्याबाबत चर्चा केली होती. या दोन्ही मागण्या अधिवेशनापूर्वी पूर्ण करू, अशी ग्वाही त्यांनी दिली होती. त्यानुसार, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच या मागण्या मान्य केल्या गेल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. पालकमंत्री Hasan Mushrif यांनी शेतकऱ्यांचे आभार मानले आहेत आणि शासन शेतकऱ्यांच्या हिताचे काम करत राहील, असे आश्वासन दिले आहे.
Web Title | Incentive Grant | Good news for farmers! Farmers will get 50 thousand; Find out instantly Will you get it?
हेही वाचा