कोथिंबीर स्वस्त आहे, चला तर मग कोथिंबीर महाग होण्याआधी पाहूया वर्षभर कोथिंबीर साठवण्यासाठी काय कराव?
नाशवंत मालावर प्रक्रिया करून आपल्याला माल जास्त दिवस साठवता येऊ शकतो आणि त्याचा वापर करून विक्री केल्याने जास्त नफा ही मिळवता येतो.
सध्या मार्केट मध्ये पालेभाज्यांची आवक खूप जास्त झाली आहे.काल दिनांक २० डिसेंबर कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेच्या माहितीनुसार कोथिंबिरीची सुमारे पावणे दोन लाख जुड्यांची आवक झाली आहे. कोथिंबीर नाशवंत असल्याने लवकर खराब होते. फ्रीज मध्ये आपण ती फक्त जास्तीत जास्त ८ दिवस साठवून ठेवू शकतो. पण आपण तीच कोथिंबीर जास्त दिवस साठवून ठेवण्याची काय प्रक्रियाआहे याची माहिती घेऊन , त्याचा वापर करून ,कोथिंबीरवर प्रक्रिया करून ती जास्तीत जास्त दिवस साठवू शकतो.
उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर ची एक जुडी जवळपास ४० ते ५० रुपये या भावाने मिळते. त्यामुळे कोथिंबीर खाण्यात कमी प्रमाणात येते परंतु आपल्याकडे साठवून ठेवलेली कोथिंबीर असेल तर आपण वर्षभरामध्ये कधीही त्याचा वापर करू शकतो. आणि त्याची चव, घेऊ शकतो.
आपण बाजारात कोथिंबीर जेव्हा स्वस्त असेल तेव्हा घरच्या घरी कोथिंबीर वर प्रक्रिया करून ती जास्तीत जास्त एक वर्ष पर्यंत कशी टिकवून ठेवायची याची प्रक्रिया ,
कोथिंबीरवर प्रक्रिया
१. कोथिंबीर आणल्यानंतर त्यातील खराब कोथिंबीर बाजूला काढावी.
२. कोथिंबिरीची चांगली पाने आणि काड्या निवडून घ्याव्या.
३. एका भांड्यामधे थंड पाणी घ्यावे त्यामध्ये बर्फाचे खडे टाकावेत आणि त्या पाण्यामध्ये कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यावी. कोथिंबीर थंडगार पाण्यामध्ये धुवून घेतल्याने त्याचा रंग आणि वास टिकून राहतो , व ती लवकर खराब होत नाही.
४. कोथिंबिर स्वच्छ धुतल्या नंतर , एका स्वच्छ कापडावर ती फॅन खाली किंवा खोलीत सुकविण्यासाठी ठेवावी .कोथिंबीर उन्हामध्ये जास्त वाळवू नये.
५. किमान दोन दिवसा नंतर कोथिंबीर चांगली वाळते. वाळलेली कोथिंबीर हाताने चोलून बारीक करून घ्यावी.
६. अशी बारीक केलेली ही कोथिंबीर तुम्ही भाजीमध्ये कसूरी मेथी प्रमाणे टाकू शकता.
७. हाताने चोळुन घेतलेल्या कोथिंबीरचे तुम्ही मिक्सर मध्ये बारीक पावडर ही करून ते पावडर हवाबंद डब्यामध्ये पूर्ण वर्षभर साठवून ठेवू शकता.
अश्या प्रकारे कोथिंबीरीवर प्रक्रिया करून तुम्ही तुमच्या खर्चाची बचत करू शकता.
सौ. स्नेहा बनसोडे
कृषि व्यवसाय व्यवस्थापन विभाग
WEB TITLE: Cilantro is cheap, so let’s see what we can do to store cilantro all year round before it becomes expensive.