रोग…
मर : हा रोग जमिनीतील बुरशीमुळे होतो. लागण झालेली रोपे निस्तेज आणि मलूल होतात. रोपाचा जमिनी लगतचा खोडाचा भाग आणि मुळे सडतात. त्यामुळे रोप कोलमडते.
उपाय : 10 लिटर पाण्यात 30 ग्रॅम कॉपरऑक्झीक्लोराईड 50 टक्के मिसळून हेक्टरी द्रावण गादी वाफे किंवा रोपांच्या मुळा भोवती ओतावे.
फळे कुजणे आणि फांद्या वाळणे : ( फ्रूट रॉट अॅड डायबॅक ) हा रोग कोलीटोट्रीकम कॅपसीसी या बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या हिरव्या किंवा लाल मिरचीवर वतुळाकार खोलगट डाग दिसतात. दमट हवेत रोगाचे जंतू वेगाने वाढतात आणि फळावर काळपट चटटे दिसतात. अशी फळे कुजतात आणि गळून पडतात. बुरशीमुळे झाडाच्या फांद्या शेंडयाकडून खाली वाळत जातात. प्रथम कोवळे शेंडे मरतात. रोगांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्यास झाडे सुकून वाळतात तसेच पानांवर आणि फांद्यांवर काळे ठिपके दिसतात.
उपाय : या रोगाची लक्षणे दिसताच शेंडे खुडून त्यांचा नाश करावा. तसेच डायथेन झेड-78 किवा डायथेन एम 45 किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड यापैकी कोणतेही एक बुरशीनाशक औषध 25 ते 30 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून रोग दिसताच दर 10 दिवसांच्या अंतराने 3 ते 4 वेळा फवारावे.
भुरी ( पावडरी मिल्डयू ) : भूरी रोगामुळे मिरचीच्या पानाच्या वरच्या आणि खालच्या बाजूवर पांढरी भूकटी दिसते. या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्यास झाडाची पाने गळतात.
उपाय : भुरी या रोगाचा प्रादुर्भाव दिसताच 30 ग्रॅम पाण्यात मिसळणारे गंधक किंवा 10 मिलीलिटर कॅराथेन 10 लिटर पाण्यात मिसळून मिरचीच्या पिकावर 15 दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.
किड
फूलकिडे : हेक्टरी किटक आकाराने अतिशय लहान म्हणजे 1 मिली पेक्षा कमी लांबीचे असतात. त्यांचा रंग फिकट पिवळा असतो. किटक पानावर ओरखडे पाडून पानाचे रस शोषण करतात. त्यामुळे पानाच्या कडा वरच्या बाजूला चुरडलेल्या दिसतात. हेक्टरी किटक खोडातील रसही शोषून घेतात. त्यामुळे खोड कमजोर बनते व पानांची गळ होते.
उपाय : रोपलावणीपासून 3 आठवडयांनी पिकावर 15 दिवसांच्या अंतराने 8 मिलीमिटर डायमेथेएम 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
मावा : हेक्टरी किटक मिरचीची कोवळी पाने आणि शेडयांतील रस शोषण करतात. त्यामुळे नविन पालवी येणे बंद होते.
उपाय : लागवडीनंतर 10 दिवसांनी 15 मिली मोनोक्रोटोफॉस 36 टक्के प्रवाही 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
स्रोत – महाराष्ट्र शासन कृषी विभाग
WEB TITLE: Chili diseases and pest management.