कृषी बातम्या

बिग ब्रेकिंग! आता ‘या’ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; प्रशासनालाही दिले निर्देश

Eknath Shinde | यंदा राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती (Agriculture) पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याच नुकसानीमुळे शेतकऱ्यांना शेती पिकांच्या नुकसानीसाठी आर्थिक (Financial) भुर्दंड सोसावा लागला. याचं आर्थिक नुकसानीच्या कचाट्यात शेतकरी सापडू नये म्हणून राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषाच्या दुप्पटीने मदत (Insurance) जाहीर केली.

तर काही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या पदरी ही मदत पडली आहे. तर अनेक शेतकरी अद्याप देखील या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्याचबरोबर ऑक्टोबर महिन्यात पावसामुळे शेतकऱ्यांचे (Lifestyle) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता याच शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतला आहे.

वाचा: ब्रेकिंग न्यूज: सौर कृषी वाहिनी योजना जाहीर: शेतकऱ्यांच्या जमीनीला मिळणार तब्बल 75,000 प्रती हेक्टर रक्कम !

या’ शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय
ऑक्टोबर महिन्यात देखील पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती (Department of Agriculture) पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दया शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय बुधवारी (2 ऑक्टोबर 2022) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे (Lifestyle) प्रथम अंदाजानुसार जवळपास 25 लाख हेक्टर इतक्या पिकांचे नुकसान झालंय. तसेच सतत पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानीपोटी सरकारकडून 750 कोटी रुपये इतक्या मदतीचे वाटप करण्यात आले आहे.

मुख्यमंत्रीचा मोठा निर्णय: परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईचा आदेश..! जाणून घ्या महत्वाचे निकष

वाचा: ऐकला का तुम्ही कधी 10 कोटींचा ‘ रेडा ‘ .. जाणून घ्या याची विशेष माहिती..

मुख्यमंत्र्यांनी दिले प्रशासनाला निर्देश
आतापर्यंत जून-जुलै पासून सुरू असलेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या 40 लाख 15 हजार 847 इतक्या शेतकऱ्यांना (Agriculture) जवळपास 4700 कोटींची मदत करण्यात आली आहे. त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे झालेल्या पिक नुकसानीचे (Crop Insurance) पंचनामे वेगाने सुरू असून, याबाबत प्रशासनाला सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. आता लवकरच ही मदत शेतकऱ्यांना मिळेल अशी आशा आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Big Breaking! Now the Chief Minister’s big decision to compensate ‘these’ damaged farmers; Urgent instructions were also given to the administration

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button