योजना
Training| मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना: बेरोजगारी कमी करण्याचा प्रभावी उपाय|
Training| मुंबई, 14 जुलै 2024: बेरोजगारी हा राज्यातील आणि देशातील एक गंभीर प्रश्न बनला आहे. या समस्येवर मात करण्यासाठी आणि तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारन “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” सुरू केली आहे.
योजनेचे उद्दिष्ट:
- शिक्षण पूर्ण झालेल्या तरुणांना सहा महिन्याचा अनुभव (Experience) कालावधी देऊन त्यांना रोजगाराच्या संधींसाठी तयार करणे.
- राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण कमी करणे.
योजनेचे लाभ:
- इयत्ता बारावी ते पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण उमेदवारांना या योजनेचा लाभ घता येईल.
- उमेदवारांना दर महिन्याला ₹6,000 ते ₹10,000 पर्यंत विद्यावेतन दिले जाईल.
- प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना प्रमाणपत्र (Certificate) दिले जाईल.
पात्रता:
- उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षे दरम्यान असावे.
- उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- उमेदवाराने संबंधित शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली असावी.
- उमेदवाराने कौशल्य, रोजगार (Employment) आणि उद्योजकता विभागाच्या वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे.
कसे अर्ज करावा:
- इच्छुक उमेदवार कौशल्य, रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर् करू शकतात.
- अधिक माहितीसाठी, उमेदवार संबंधित विभागाशी संपर्क साधू शकतात.
योजनेचे महत्त्व:
- ही योजना तरुणांना रोजगाराच्या सधींसाठी आवश्यक कौशल्ये (skills) शिकण्यास मदत करेल.
- यामुळे राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
- ही योजना ग्रामीण भागातील तरुणांसाठी विशेष फायदेशीर ठरेल.
राज्य सरकारने या योजनेसाठी ₹10,000 कोटींचे बजेट निश्चित केले आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तरुणांनी पुढाकार (initiative) घेणे गरजचे आहे.